दिल्ली : शिक्षण क्षेत्रात (Education) सरकारी नोकरीच्या (Government Job)शोधात असलेल्या तरुणांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री (Central Education Minister) धर्मेंद्र प्रधान यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये ६ हजांरहून अधिक शिक्षक (Teacher) भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे .
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील अंमलबजावणी आणि नव्याने सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राबाबत विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लवकरच परीक्षा घ्याव्यात याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांनी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे.
या प्रक्रियेमध्ये सर्व विद्यापीठांच्या आरक्षित प्रवर्गातील आत्तापर्यंतची रिक्त पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल. भरती प्रकिया 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनादिवशी सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व विद्यापीठातील संस्थांना याबाबतची जाहिराती जारी करण्यासाठी 6 ते 10 सप्टेंबर दरम्याचा वेळ दिला जाईल. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच कुलगुरूंनी त्यांच्या विद्यापीठांमध्ये खेळालाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जेणेकरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.
या निर्णयाबरोबरच मंत्रालयाकडून (Education Ministry) रिक्त पदाची जातीनिहाय (Cast) आकडेवारी जाहीर केली असून , देशातील विद्यापीठांमध्ये एकूण 6229 पदे रिक्त आहेत. यापैकी एससी साठी 1012, एसटी साठी 592, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 1767, ईडब्ल्यूएस साठी 805 व दिव्यांग श्रेणीसाठी 350 जागा रिक्त आहेत. तसेच उर्वरित खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी पदे आहेत.
माध्यमांच्या अहवालानुसार, (media report) दिल्ली विद्यापीठासह 44 पैकी 15 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पर्मनंन्ट शिक्षकांच्या पदांच्या 40% हुन अधिक जास्त जागा रिक्त आहेत. तसेच अलाहाबाद विद्यापीठ (Allahabad University)आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशा (Central University of Odisha) मध्ये शिक्षकांच्या पदापैकी 70% जास्त जागा रिक्त आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.