LAC
LACDainik Gomantak

Light Combat Aircraft: भारताचा दबदबा, 16 देशांनी मागवली LAC तेजसची माहिती

Light Combat Aircraft: लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच LCA तेजस Mk2 बनवण्याचे काम भारतात सुरु आहे.
Published on

Light Combat Aircraft: लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच LCA तेजस Mk2 बनवण्याचे काम भारतात सुरु आहे. सध्या हा वेग वाढवण्यासाठी योजना तयार केल्या जात आहेत. जगातील 16 देशांनी तेजसची माहिती मागितल्याचेही वृत्त आहे. LCA MK2 ला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने सप्टेंबरमध्ये मंजुरी दिली होती. सध्या या लढाऊ विमानाच्या डिझाइन आणि विकासावर काम सुरु आहे.

दरम्यान, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे LCA MK2 प्रकल्प संचालक डॉ व्ही मधुसूदन राव म्हणाले की, "आधीपासूनच, विमानाबाबत (Airplanes) 16 देशांकडून सुरु असलेल्या चौकशी दरम्यान, केंद्र सरकार उत्पादन दर वाढवण्यावर भर देत आहे." हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) व्यतिरिक्त इतर एजन्सी देखील यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 LAC
HAL Recruitment 2022: 10वी पास तरुणांसाठी परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी

तसेच, भारतीय हवाई दलातून (Air Force) मिग-29, मिराज 2000 आणि जग्वार फ्लीट विमाने सोडल्यानंतर, एलसीए तेजस एमके2 स्क्वॉड्रनमध्ये त्यांची जागा घेईल. राव यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाला 10 स्क्वॉड्रन्स दोन टप्प्यात मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com