HAL Recruitment 2022: 10वी पास तरुणांसाठी परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी

HAL Bharti 2022: अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
HAL Recruitment 2022
HAL Recruitment 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे अनेक पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट hal.india.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, 455 ITI ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार असुन इच्छुक उमेद्वारांनी अर्ज करावे.

रिक्त पदांचा तपशील
एकूण - 455
फिटर : 186
टर्नर : 28
मशीनिस्ट : 26
कारपेंटर : 4
मशीनिस्ट (ग्राइंडर) : 10
इलेक्ट्रिशियन : 66
ड्रॉफ्ट्समॅन (मेकॅनिकल) : 6
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) : 8
पेंटर : 7
शीट मेटल वर्कर : 4
मेकॅनिक (मोटर व्हेइकल) : 4
कंप्यूटर ऑपरेटर (COPA) : 88
वेल्डर (गैस एवं इलेक्ट्रिक) : 8
स्टेनोग्राफर (इंग्लिश) : 6
फ्रिज/एसी मेकॅनिक : 4

HAL Recruitment 2022
OnePlus 10T 3 ऑगस्टला होणार भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

अशी होणार निवड

455 पदांची निवड होईल, उमेदवारांची निवड कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. त्यामुळे निवडलेल्या उमेदवारांची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली जाईल. तसेच आवश्यक असल्यास, उमेदवाराची निवड लेखी चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाऊ शकते. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट hal.india.co.in वर जाऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासू शकतात.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी आणि विहित ट्रेडमधील ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) किंवा स्टेट कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (SCVT) कडून अधिसूचित ट्रेडमध्ये ITI पास प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com