बंगळूरुमध्ये आढळला Zika Virus चा पहिला रुग्ण, जाणून संसर्गाची लक्षणे आणि प्रतिबंधासाठी तज्ञ डॉक्टरांचे मत

Zika Virus: बंगळूरुजवळील चिक्कबल्लापूरमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे.
Zika Virus
Zika VirusDainik Gomantak

Zika Virus: बंगळूरुजवळील चिक्कबल्लापूरमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात येणाऱ्या सर्व तापाच्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने चिक्कबल्लापूरच्या पाच किलोमीटरच्या परिघात सतर्कतेचा इशारा दिला आहे. झिका विषाणूची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध यावर शिवेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ एम के शर्मा (एमडी) यांचे मत या बातमीद्वारे जाणून घेऊया.

झिका व्हायरस

झिका विषाणू हा एक संसर्ग आहे, जो संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. बहुतेक लोकांमध्ये, झिका विषाणूमुळे गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि, जर गर्भवती महिलेला संसर्ग झाला असेल तर, झिका विषाणू तिच्या न जन्मलेल्या बाळाला देखील प्रभावित करु शकतो. हा विषाणू पसरवणारा डास दिवसा आणि रात्री चावतो.

Zika Virus
Karnataka Govt Circular: मंदिरांना निधी देण्यावर बंदी घालणारे परिपत्रक अखेर मागे; कर्नाटक सरकारचा निर्णय

झिका व्हायरस कसा पसरतो?

झिका विषाणू डासांच्या चाव्याव्दारे पसरतो

शारीरिक संबंध ठेवण्यापासून

ब्लड ट्रांसफ्यूजन

हे गर्भवती महिलेपासून तिच्या न जन्मलेल्या बाळामध्ये देखील पसरु शकते.

Zika Virus
Zika Virus: झिका व्हायरसची लक्षणे कोणती जाणुन घेउया एका क्लिकवर

संरक्षण कसे करावे

तुमच्या घराभोवती इतर कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नका.

संध्याकाळी आणि सकाळी घरातच राहा, कारण डास जास्त सक्रिय असतात.

तुमचे कपडे आणि शूज परमेथ्रिन या द्वारे स्प्रे करा.

जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा लांब बाह्यांचे कपडे घाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com