Terror Module Busted: लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पंजाबमध्ये पर्दाफाश, शस्त्रे आणि IED सह 2 जणांना अटक

Lashkar-e-Taiba Module Busted: पंजाब पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून दोन जणांना अटक करुन लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.
Punjab Police
Punjab PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Lashkar-e-Taiba Module Busted: पंजाब पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून दोन जणांना अटक करुन लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.

पंजाब पोलिसांनी आज (शनिवार) जम्मू-काश्मीरमधील दोन रहिवाशांना अटक करुन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी), दोन हॅण्डबॉम्ब, एक पिस्तूल, दोन मॅगझिन, 24 काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.

लष्कर मॉड्यूलचा पर्दाफाश

डीजीपी गौरव यादव म्हणाले की, अमृतसर पोलिसांच्या (Police) राज्य स्पेशल ऑपरेशन सेलने केंद्रीय एजन्सीच्या सहकार्याने ही कारवाई केली. पोलीस आणि एजन्सी दोघेही चौकशी करत आहेत आणि त्यांची योजना काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काही मोठा कट रचण्याची योजना आखली होती का? याचाही तपास करण्यात येत आहे.

Punjab Police
Punjab: पंजाबमधील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात, 19 महिन्यांत 272 जणांचा मृत्यू; NCRB ची धक्कादायक आकडेवारी

संशयितांकडून काय जप्त केले?

डीजीपी पंजाब पोलिसांनी ट्विट करत म्हटले की, एसएसओसी-अमृतसरने केंद्रीय एजन्सीसह संयुक्त ऑपरेशनमध्ये एलईटी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि 2 लोकांना अटक केली. हे दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 2 आयईडी, 2 हॅणडबॉम्ब, 2 मॅगझिनसह 1 पिस्तूल, 24 काडतुसे, 1 टायमर स्विच, 8 डिटोनेटर आणि 4 बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.

Punjab Police
Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

लष्करचे मॉड्यूल कोण हाताळत होते?

डीजीपी पंजाब पोलिसांनी माहिती दिली की, दहशतवादी (Terrorist) मॉड्यूल लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य फिरदौस अहमद भट हाताळतो. पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलला मोठा धक्का बसला आहे. पंजाबला पुन्हा एकदा अस्थिर करण्याचा या मॉड्यूलचा डाव होता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com