हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh Landslide) किन्नौरमध्ये(Kinnaur) आज दुपारी मोठा अपघात झाला आहे . या ठिकाणी भूस्खलनामुळे (Landslide) प्रवाशांनी भरलेली बस अक्षरश पूर्णपणे दबली गेली. बसशिवाय दोन कारही ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Landslide In Himachal Pradesh, more than 40 people getting stuck)
किन्नौर जिल्ह्यातील चौरा येथे असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमुळे 40 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.भारतीय लष्कर आणि NDRF ची मदत आता प्रशासनाकडून घेतली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, अडकलेली बस हिमाचल रोडवेजची आहे. ज्यात 40 पेक्षा जास्त प्रवासी आहेत.
ही बस किन्नौरहून शिमलाकडे जात असताना हा अपघात घडला आहे अजूनही या ठिकाणी डोंगरावरून काही दगड पडत आहेत, ज्यामुळे बचाव कार्यात समस्या येत आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसचे चालक आणि वाहकही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून जी चित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत ती बरीच धक्कादायक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग खाली कोसळला आणि त्यानंतर त्यातूनच ही दुर्घटना घडली आहे. ज्या रस्त्यावर ही घटना घडली आहे हा रस्ता डोंगराच्या कडेला आहे हे घटनास्थळावरून आलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. डोंगरावरून पडलेला मलबा थेट रस्त्यावरून खाली येताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य सुरू असून पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांना बचाव कार्य लवकरात लवकर करण्यास सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. जिथे माती, डोंगरावरून पडणारे दगड यामुळे अनेक अपघात झाले आहेत. डोंगराळ भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.