Lakhimpur Kheri Violence: काँगेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला?

लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी काँग्रेसने पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.
Lakhimpur Kheri Violence: Congress ask an appointment with President Ram Nath Kovind
Lakhimpur Kheri Violence: Congress ask an appointment with President Ram Nath KovindDainik Gomantak
Published on
Updated on

लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी काँग्रेसने (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर घटनास्थळी झालेली वस्तुस्थिती मांडण्याची परवानगी देखील मागितली आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी पत्र लिहिले आहे. या सात सदस्यीय शिष्टमंडळात राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, खासदार एके अँटनी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, खासदार अधीर रंजन चौधरी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि गुलाम नबी आझाद राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार आहेत. (Lakhimpur Kheri Violence: Congress ask an appointment with President Ram Nath Kovind)

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंहच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. आपल्या लखीमपूर भेटीशी संबंधित एक व्हिडिओ जारी करताना राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले की, 'पीडितांना न्याय द्यावा लागेल. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी घटनास्थळी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले' आणि लखीमपूर खेरी हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर ते दोन दिवस पोलीस कोठडीत होते. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

Lakhimpur Kheri Violence: Congress ask an appointment with President Ram Nath Kovind
त्यांचे मृत्यू म्हणजे 'एक्शन ची रिएक्शन' राकेश टिकैतांचे वादग्रस्त विधान

दरम्यान या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होत, ' सरकार शेतकऱ्यांवर फक्त अन्याय करत आहे असा आरोप करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांवर नियोजितरित्या आक्रमण होत आहे. शेतकऱ्यांचं जे आहे ते त्यांच्याकडून हिसकावलं जात हे दुर्भाग्य आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये असूनही ते लखीमपूरला गेले नाहीत. आज मी दोन मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहे.मला खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मला तिथे जाणे गरजेचं आहे असे सांगत त्यांनी लखीमपूर खैरी भागात जाणारच असेही सांगतिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com