शेतकऱ्यांचा आज देशभर 'रेल रोको'

संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी सहा तासांचे देशव्यापी 'रेल रोको' (Rail Roko)आंदोलन पुकारले आहे.
Lakhimpur Kheri Issue: Farmers calls Rail Roko
Lakhimpur Kheri Issue: Farmers calls Rail Roko Dainik Gomantak
Published on
Updated on

लखीमपूर खैरी प्रकरणावरून (Lakhimpur Kheri Issue) शेतकरी आता अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करत संयुक्त किसान मोर्चाने (SKM) सोमवारी सहा तासांचे देशव्यापी 'रेल रोको'(Rail Roko)आंदोलन पुकारले आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शेतकरी संघटनांशी संबंधित आंदोलक देशातील अनेक रेल्वे ट्रॅक जाम करतील. मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला (Ashish Mishra) लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.मात्र त्याची पूर्ण चौकशी व्हावी आणि अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीवर शेतकरी असून बसले आहेत. (Lakhimpur Kheri Issue: Farmers calls Rail Roko)

त्याचबरोबर, या काळात पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अलर्टही जारी केला आहे. याबाबत लखनौ पोलिसांनी म्हटले आहे की, शेतकरी संघटनेच्या 'रेल रोको आंदोलनात' सहभागी झालेल्यांवर पोलीस कारवाई करतील. जिल्ह्यात 144 सीआरपीसी म्हणजेच जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे आणि जर कोणी सामान्य स्थितीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर एनएसए लावला जाईल.

किसान मोर्चा कडून याबाबात एक निवेदन जारी केले होते ज्यात म्हटले आहे की, 'लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे आणि त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी जेणेकरून लखीमपूर खेरी हिंसाचारात न्याय मिळू शकेल.' यासाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी रेल्वे सेवा विस्कळीत होईल मात्र रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान न करता रेल रोको शांततेत राहील असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Lakhimpur Kheri Issue: Farmers calls Rail Roko
केरळमध्ये आभाळ फाटलं, पावसामुळे 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू

संयुक्त किसान मोर्चा समन्वय समितीचे सदस्य बलबीर राजेवाल यांनी सांगितले की, अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा हे लखीमपूर खेरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास रेल्वे पूर्णपणे थांबवण्यात येतील. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू आणि शीख यांच्यातील द्वेष, वैर आणि जातीय शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याचे मोर्चाने म्हटले आहे. शांततापूर्ण आंदोलकांना चिरडण्यासाठी त्यांची वाहने वापरली गेली.असा थेट आरोप देखील संयुक्त किसान मोर्चाने केला आहे आणि त्याचमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जोर धरला आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जण ठार झाले होते. केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने एका शेतकऱ्याला गोळ्या घातल्या तर इतरांना त्याच्या वाहनांनी चिरडल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला होता. टेनीने मात्र आरोप फेटाळून लावले, की त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित नव्हता. आशिषने तेच पुनरावृत्ती केली आणि एसकेएमचे आरोप नाकारले. या प्रकरणात आशिष मिश्रासह आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com