वाराणसीतील गंगा घाटावर मूलभूत सुविधांचा अभाव; उष्णतेने नागरिक त्रस्त

लोकांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवडा भासत आहे.
Lack of basic facilities on Ganga Ghat in Varanasi
Lack of basic facilities on Ganga Ghat in VaranasiDainik Gomantak

नेहमी लोकांनी गजबजलेला गंगा घाट ओस पडला आहे. वाराणसीतील तापमान वाढले असून, याचा दुष्परिणाम गंगा घाटावर अवलंबून असलेल्या लोकांच्या व्यवसायावर होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या तुटवडा भासत आहे. वाराणसीचे तापमान 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. (Lack of basic facilities on Ganga Ghat in Varanasi)

Lack of basic facilities on Ganga Ghat in Varanasi
जम्मू-काश्मीर पोलिसांनी रिलीज केली 'द अनटोल्ड काश्मीर

वाराणसीच्या राजघाटावर पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांचे हाल होत आहेत. येथील थंड पाण्याचे कुलर बंद स्थितीत आहेत. वाराणसी निषाद कल्याण समितीच्या उपाध्यक्षा दुर्गा साहनी सांगतात की त्यांची कमाई 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. विक्रमी उष्णतेमुळे प्रवासी येण्यास इच्छुक नाहीत. जे येत आहेत त्यांना पिण्याचे पाणी (Water) मिळत नाही. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. गंगा घाटाला भेट देण्यासाठी आलेल्या स्थानिक अनुपम राय यांनी सांगितले की, जूनमध्ये अशी उष्णता पडायची. सध्या तापमान 42.4 अंशांवर पोहोचले आहे. किमान पिण्याच्या पाण्याची आणि तंबूची व्यवस्था तरी महापालिकेने करावी, असे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी, राजघाटाच्या काठावर पूजा करणारे पांडा पंकज तिवारी यांनी सांगितले की ते गंगा घाटावर पिंड दान करतात. शासन व महापालिकेची यंत्रणा नाही. गंगा घाटावर महिलांसाठी (Women) चेंजिंग रूमही नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com