Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 16 जणांचा मृत्यू

Jammu and Kashmir Bus Accident Today: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. रामनगर-उधमपूर महामार्गावरील कागोर्ट गावाजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटून भीषण अपघात झाला.
Jammu and Kashmir Bus Accident Today
Jammu and Kashmir Bus AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Jammu and Kashmir Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. रामनगर-उधमपूर महामार्गावरील कागोर्ट गावाजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटून भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत 16 जणांनी आपला जीव गमावला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (20 एप्रिल) सकाळी झालेला हा अपघात इतका भीषण होता की, बस महामार्गावरुन घसरली आणि कागोर्ट गावाजवळ पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका दुर्गम गावातून उधमपूरच्या दिशेने जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अतिवेगामुळे बस घसरली आणि ही मोठी दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाने बचाव कार्याला वेग दिला आहे. उपजिल्हा दंडाधिकाऱ्यांनी (SDM) या घटनेची तातडीने दखल घेत जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. उधमपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Jammu and Kashmir Bus Accident Today
Jammu And Kashmir: स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश, दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापेमारी; पाकड्यांना अद्दल घडवल्यानंतर कारवाई

या दुर्घटनेबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी खोल दुःख व्यक्त केले. डॉ. सिंह यांनी उधमपूरचे जिल्हा आयुक्त मिंगा शेर्पा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. डॉ. सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची म्हणजेच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मोठ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली जात आहे. "आम्ही स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.

Jammu and Kashmir Bus Accident Today
Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) रस्ते अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. कालच राजौरी जिल्ह्यात अशाच प्रकारचा एक अपघात झाला होता, ज्यामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरचे नियंत्रण सुटल्याने 18 जण जखमी झाले होते. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या उधमपूरमधील घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे पथक तैनात असून, बसच्या ढिगाऱ्याखालून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com