
Kuldeep Yadav Wicket Taker: वेस्ट इंडीजविरुद्ध दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 असे एकूण 8 बळी घेतले. या 9 विकेट्समुळे कुलदीप या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या यादीत मागे सोडले.
दरम्यान, 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी (India) सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुलदीपने अव्वल स्थान पटकावले. कुलदीपने केवळ 18 डावात 38 बळी घेत हा विक्रम केला, तर मोहम्मद सिराज 15 डावात 37 बळी घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे.
तसेच, 2025 या वर्षात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे, टी-20) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
कसोटी (Test): 2 सामन्यांच्या 4 डावात 12 बळी घेतले आहेत.
वनडे (ODI): 7 सामन्यांमध्ये 9 बळी मिळवले आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय: 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 17 बळी घेतले आहेत.
याशिवाय, आयपीएलमध्येही त्याने 14 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या.
वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडियाची नजर ऑस्ट्रेलिया मालिकेवर आहे. भारत 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे, त्यानंतर टी-20 मालिका होईल. या दोन्ही मालिकांसाठी कुलदीप यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीप आपला हा शानदार फॉर्म ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या आगामी मालिकेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.