भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूची अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; रोहित, विराटचं नाव घेत भावुक पोस्ट

KS Bharat retirement: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून चंदीगड येथील मुल्लांपुर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
KS Bharat retires from international cricket
KS Bharat retires from international cricketDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून चंदीगड येथील मुल्लांपुर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत असतानाच, भारतीय गोटातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज केएस भरत याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सामन्याच्या अवघ्या काही तास आधी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावरून दिली माहिती; दिग्गज कर्णधारांचे मानले आभार

केएस भरतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांशी ही माहिती शेअर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताना त्याने भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या क्रिकेट प्रवासात पाठिंबा देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे ऋण व्यक्त केले.

भरतने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे विशेष आभार मानले. विराटच्या नेतृत्वाखाली त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, तर रोहितच्या कॅप्टन्सीत त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले होते. तसेच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाल्याचे त्याने आवर्जून नमूद केले.

KS Bharat retires from international cricket
Goa Monsoon Tourism: नवीन धबधब्यांची ठिकाणे करणार खुली; दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी- डॉ. दिव्या राणे

ऋषभ पंतच्या जागी मिळाली होती संधी

स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या भीषण अपघातानंतर निवडकर्त्यांनी केएस भरतवर मोठा विश्वास दाखवला होता. त्याला २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final) अंतिम सामन्यातही खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. दुर्दैवाने, फलंदाजीत तो आपली छाप पाडू शकला नाही. भरतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ कसोटी स्वरूपापुरतीच मर्यादित राहिली; त्याला एकदिवसीय (ODI) किंवा टी-२० (T20) क्रिकेटमध्ये कधीही पदार्पण करता आले नाही.

KS Bharat retires from international cricket
Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द

केएस भरतने २०२३ मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने भारतासाठी एकूण ७ कसोटी सामने खेळले. यादरम्यान, २०.०९ च्या सरासरीने त्याने केवळ १९९ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. २०२४ मध्ये विशाखापट्टनम येथे इंग्लंडविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. खराब फॉर्ममुळे त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता आणि अखेर पुनरागमन न होऊ शकल्याने त्याने निवृत्तीचा मार्ग निवडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com