Koo Becomes 2nd Largest Social Media: एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानतंर भारतीय मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या कू (Koo) ला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कंपनीचे संस्थापक मयंक बिद्वतका यांच्या माहितीनुसार सध्या कू हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मायक्रो ब्लॉगिंक प्लॅटफॉर्म बनला आहे.
कू हा सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या 5 कोटीच्याही पुढे गेली आहे. तर या प्लॅटफॉर्मवर 10 भाषांमध्ये पोस्ट टाकण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. कू अॅपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले की, केवळ 2.5 वर्षांमध्ये आम्ही जगात दुसऱ्या क्रमांकाची मायक्रोब्लॉगिंग साईट बनलो आहोत. कू सुरू झाल्यापासून आमच्या युजर्सनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे.
कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार सध्या कू अॅप भारतासह अमेरिका, युनायटेड किंग्डम, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, यूएई, अल्जेरिया, नेपाळ आणि इराण यांच्यासह 200 हून अधिक देशांत उपलब्ध आहे. मार्च 2020 मध्ये हे अॅप लाँच करण्यात आले होते. बंगळूरच्या बॉम्बीनेट टेक्नॉलॉजीज प्रा. लि.ने हे अॅप बनवले आहे.
दरम्यान, जगात सर्वाधिक 22 कोटी युजर ट्विटरकडे आहेत. त्यात अमेरिकेतील 7.6 कोटी तर भारतात 2.3 कोटी युजर्स आहेत. जगभरात दररोज 50 कोटी ट्विट केले जातात. जुलै 2006 मध्ये ट्विटर लाँच झाले होते. दरम्यान, ट्विटरवरील ब्लु टिकसाठी शुल्क सुरू केल्यानंतर त्याचा फायदा मायक्रो-ब्लॉगिंग साइट मॅस्टोडॉन (Mastodon) ला होत आहे. पण सध्या त्यांच्याकडे 5 लाख युजर्स आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.