G20 शिखर परिषदेदरम्यान खलिस्तान्यांना करायचा होता मोठा धमाका, जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी...

India-Canada Khalistan: G-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची चर्चा जगभर झाली.
Khalistan
KhalistanDainik Gomantak
Published on
Updated on

India-Canada Khalistan: G-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची चर्चा जगभर झाली. 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण जगाला भारताने आपली ताकद दाखवून दिली. पण भारताची वाढती ताकद पाहून खलिस्तान्यांच्या पोटात दुखू लागले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी, शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित खलिस्तानी दहशतवाद्यांना (Terrorists) भारताची राजधानी दिल्लीतील विमानतळ आणि काही मेट्रो स्थानकांना लक्ष्य करायचे होते.

G20 च्या आधी झालेल्या मल्टी एजन्सी सेंटरच्या बैठकीत हे उघड झाले, ज्यामध्ये देशाच्या सुरक्षेशी संबंधित सर्व एजन्सी सामील होत्या.

Khalistan
India-Canada: संतापजनक व्हिडिओ व्हायरल, खलिस्तान समर्थकांकडून तिरंग्याची जाळपोळ

व्हॉईस मेसेजमध्ये पन्नूचा आवाज

या बैठकीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी यूकेमधून एका भारतीय मोबाइल नंबरवर एक व्हॉइस मेसेज आला जो SFJ शी संबंधित सदस्याचा होता, ज्यामध्ये गुरुपतवंत सिंग पन्नूचा आवाज ऐकू येत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॉइस मेसेजमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्लीत (Delhi) बॉम्बस्फोट घडवून आणण्याची केली चर्चा होती. दिल्ली विमानतळ आणि अनेक मेट्रो स्थानकांवर हे बॉम्बस्फोट होणार होते.

दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी आणखी एक कॉल इंटरसेप्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये जी 20 शिखर परिषदेची ठिकाणे आणि प्रतिनिधी जिथे राहतील त्या हॉटेलांना देखील लक्ष्य केले जाईल असे सांगण्यात आले होते.

यानंतर, 1 सप्टेंबर रोजी, इंटेलिजन्स ब्युरोने एक व्हॉईस मेसेज इंटरसेप्ट केला, ज्यामध्ये पन्नूचा आवाज तोच होता.

Khalistan
'जर मर' म्हणणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे...', हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

विमानतळ-मेट्रो स्थानकांवर स्फोटाची चर्चा

या व्हॉईस मेसेजमध्ये गुरुपतवंत सिंग पन्नू हा केवळ दिल्ली विमानतळ आणि अनेक मेट्रो स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याबद्दल बोलत नाहीत तर या ठिकाणी खलिस्तानी झेंडे फडकवण्याबाबतही बोलत होता, जो भारत सरकारसाठी एक संदेश आहे.

सुरक्षा एजन्सीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्नू या सगळ्यात फिलिपाइन्सस्थित गँगस्टर मनप्रीत सिंग पिटा याची मदत घेत होता. मनप्रीत सिंग पिटा हा कॅनडास्थित गँगस्टर अर्श डल्लाचा जवळचा मित्र आहे. पण याआधीही 11 ऑगस्टला एनआयएने मनप्रीत सिंगला मारहाण केली आणि त्याचा भाऊ मनजीतला फिलिपाइन्समधून भारतात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com