आता खलिस्तान्यांची खैर नाही, भारत सरकारने दिले दहशतवाद्यांची लिस्ट तयार करण्याचे निर्देश

Khalistan Terrorists: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Khalistan Terrorists: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

यातच आता, भारत सरकारने खलिस्तानी विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिका (यूएस), ब्रिटन (ब्रिटन), कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील सर्व खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे निर्देश भारत सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याशिवाय, त्यांचे OCI कार्ड रद्द करुन त्यांच्या भारतात प्रवेशावर बंदी घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

भारतातील खलिस्तानी दहशतवाद्यांची मालमत्ता आणि त्यांच्या हितचिंतकांची मालमत्ता आणि बँक खातीही जप्त करण्यात यावीत, असेही सरकारने म्हटले आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोठे पाऊल

खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात (Terrorists) भारत सरकारचे हे मोठे पाऊल आहे, कारण अनेक खलिस्तानी समर्थक परदेशात बसून आपला अजेंडा चालवतात आणि भारतात गुंतवणूक करुन संपत्ती कमावत आहेत. त्यांच्याकडे OCI कार्ड देखील आहे, ज्याद्वारे त्यांच्या भारतात येण्या-जाण्यावर कोणतेही बंधन नाही.

PM Modi
Khalistan March: भारताच्या मित्रराष्ट्रांच्या अडचणीत वाढ! खलिस्तानी संघटनांच्या प्रदर्शनाविरुद्ध काय घेणार भूमिका?

OCI कार्ड रद्द झाल्यास काय होईल?

काही दिवसांपूर्वीच सरकारने त्यांची कॅनडामधील (Canada) व्हिसा सेवा काही दिवसांसाठी बंद केली आहे. यातच आता, या खलिस्तानी दहशतवाद्यांचा ओसीआय रद्द झाल्यास ते भारतात येऊ शकणार नाहीत.

अशा परिस्थितीत या लोकांना भारतात येणे कठीण होईल कारण जेव्हा जेव्हा हे लोक व्हिसासाठी अर्ज करतील तेव्हा त्यांना व्हिसा मिळणे कठीण होईल.

PM Modi
Canada Khalistan Referendum: धक्कादायक! खलिस्तानसाठी कॅनडामध्ये मतदान; भारताच्या इशाऱ्यानंतर ट्रुडो सरकारचे दुर्लक्ष

पन्नूवर मोठी कारवाई

याशिवाय, त्यांनी भारतात त्यांच्या स्वत:च्या नावावर आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या मालमत्तेवरही भारत सरकार कारवाई करु शकेल, ज्यामुळे त्यांच्या भारतविरोधी अजेंड्याला आळा बसेल.

विशेष म्हणजे, सरकारने खलिस्तानींच्या विरोधात आणखीनच कंबर कसली आहे. कॅनडामध्ये लपलेला खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर मोठी कारवाई करत NIA ने अमृतसर आणि चंदीगडमधील त्याची मालमत्ता जप्त केली आहे.

जो कोणी खलिस्तानबद्दल बोलेल त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील, असाही संदेश भारत सरकारने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com