केरळ पोलिसांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी कनेक्शन; NIA ने डीजीपींना पाठवला अहवाल

Kerala Police: केरळ पोलिसांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala News: केरळ पोलिसांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. केरळ पोलिसांच्या 873 कर्मचाऱ्यांचे प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने (IB) केरळच्या पोलीस महासंचालकांना याबाबतचा अहवालही दिला आहे. अहवालानुसार, केरळ पोलिसांच्या 873 कर्मचाऱ्यांचे प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

एसआय आणि एसएचओ दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पीएफआय कनेक्शन

इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या अहवालानुसार, उपनिरीक्षक (SI), स्टेशन हेड ऑफिसर (SHO) आणि पोलिस दर्जाचे अधिकारी केंद्रीय एजन्सीच्या रडारावर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आता या अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील गोळा करत आहे. जेणेकरुन पीएफआय कनेक्शन शोधता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
PM Narendra Modi: यांच्या सभेसाठी पत्रकारांकडे कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी

गोपनीय माहिती लीक झाल्याचा आरोप

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या अहवालानुसार, केरळ (Kerala) पोलिस अधिकार्‍यांवर प्राथमिक आरोप असा आहे की, त्यांनी राज्य पोलिसांच्या नियोजनासह, विशेषत: छाप्यांशी संबंधित माहिती लीक केली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, थोडुपुझा येथील करिमन्नूर पोलीस स्टेशनशी संलग्न असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेत्यांचे तपशील पीएफआयला लीक केल्याच्या आरोपावरुन सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. अशाच आरोपाखाली मुन्नार पोलिस ठाण्यातून एका एसआयसह तीन पोलिसांची बदलीही करण्यात आली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर 5 वर्षांची बंदी

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित 8 संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली. गृह मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि 8 संलग्न संघटनांवर जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल आणि अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
PM Modi Birthday: PM मोदींचा आजचा संपूर्ण कार्यक्रम काय आहे, वाचा एका क्लिकवर

दुसरीकडे, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, असेही म्हटले आहे की, UAPA च्या कलम 3(1) अंतर्गत अधिकारांचा वापर करुन, सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या संलग्न संस्था किंवा मोर्चांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्धच्या छाप्यांमध्ये पुरावे सापडले

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) व्यतिरिक्त, इतर एजन्सींनी 22 सप्टेंबर रोजी 15 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. छाप्यादरम्यान, तपास यंत्रणांना पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांविरोधात पुरावे मिळाले होते. यानंतर केंद्रीय एजन्सींनी 9 राज्यांमधील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
PM Modi Birthday 2022: नवरात्रीत नरेंद्र मोदी 9 दिवस करतात उपवास

शिवाय, छाप्यांच्या पहिल्या टप्प्यात, 106 आणि छाप्यांच्या दुसऱ्या टप्प्यात, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित 247 लोकांना अटक / ताब्यात घेण्यात आले. छाप्यांमध्ये तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात भक्कम पुरावे मिळाले होते, त्यानंतर गृह मंत्रालयाने पीएफआय आणि त्याच्या 8 संघटनांवर देशभरात बंदी घातली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com