Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

Kerala King Cobra Rescue: केरळमधील वन विभागाच्या अधिकारी जीएस रोशनी यांनी धैर्याने पकडलेला साप पाहून नेटिझन्सची मने जिंकली आहेत.
Kerala King Cobra Rescue
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala King Cobra Rescue: केरळमधील वन विभागाच्या अधिकारी जीएस रोशनी यांनी धैर्याने पकडलेला साप पाहून नेटिझन्सची मने जिंकली आहेत. त्यांनी 16 फूट लांबीच्या किंग कोब्राची सुटका केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. निवृत्त भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पारुथिपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट ऑफिसर जीएस रोशनी अवघ्या काही मिनिटांत एका ओढ्यात रेंगाळणाऱ्या धोकादायक सापाला नियंत्रित करताना दिसत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पेप्पारा जवळील जंगलातील ओढ्यातून या किंग कोब्राची सुटका करण्यात आली, जिथे स्थानिक लोक अनेकदा आंघोळीसाठी जातात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी रोशनी यांनी ताबडतोब कारवाई केली. काही मिनिटांतच, 'महाकाय' सापाला पकडून जंगलातील सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेण्यात आले आणि तिथे सोडून देण्यात आले.

Kerala King Cobra Rescue
Viral: 'Will You Marry Me?' म्हणताच... पाय घसरला अन् धबधब्यात वाहून गेला तरुण, प्रेयसीची आरडाओरडा; पाहा थरारक VIDEO

16 फूट लांबीच्या किंग कोब्राची सुटका

निवृत्त आयएफएस सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'ग्रीन क्वीन्स'... त्यांच्या शौर्याला माझा सलाम. जीएस रोशनी या केरळ (Kerala) वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचा भाग आहेत, ज्यांनी 16 फूट लांबीच्या किंग कोब्राची सुटका केली.

Kerala King Cobra Rescue
Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

800 हून अधिक सापांना वाचवले

त्यांनी सांगितले की, जीएस रोशनी किंग कोब्रासारख्या धोकादायक सापाशी सामना करण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु त्यांनी काही मिनिटांतच हा महाकाय साप यशस्वीरित्या पकडला. त्यांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत 800 हून अधिक सापांना वाचवले आहे. दुसरीकडे, किंग कोब्राच्या बचावाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स महिला अधिकाऱ्याच्या शौर्याचे आणि संयमाचे कौतुक करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, खूप धाडसी महिला. दुसऱ्याने लिहिले की, वन अधिकारी, ग्राउंड स्टाफ आणि सुरक्षा कर्मचारी हेच खरे लोक आहेत जे त्यांचे काम करतात. तिसऱ्याने लिहिले की, कोब्राचा आकार पाहून मलाही धक्का बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com