Kerala Traffic Camera Challan: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता अनेक ठिकाणी मोबाईलवर चलन पाठवले जात आहे. त्यात काय नियम मोडला आहे याची माहिती व्हावी, किंवा नियम मोडल्याचा पुरावा म्हणून संबंधित वाहनधारकाचा रियलटाईम फोटोही या चलनसोबत पाठवला जातो. हे आता कॉमन झाले असले तरी या प्रकाराने केरळमध्ये एक संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.
(Husband in trouble as wife gets his traffic camera pics with woman friend)
हे प्रकरण केरळमधील इडुक्की येथील रहिवासी आहे. 25 एप्रिल रोजी हा पुरूष त्याच्या गर्लफ्रेंडसोबत विना हेल्मेट त्याच्या स्कुटीवरून जात होता. डोक्यावर हेलमेट नसल्याने त्याला वाहतुकीचा नियम मोडल्यावरून चलन पाठविण्यात आले.
स्कूटी पुरुषाच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत होती. त्यामुळे चलन देखील पत्नीच्या फोन नंबरवर पाठविण्यात आले होते. पण त्यामुळे पत्नीचा रागाचा पारा प्रचंड चढला.
कारण या चलनसोबत पतीचा रियलटाईम फोटोदेखील पाठविण्यात आला होता. त्यात पती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गाडीवरून जाताना दिसत होता. पत्नीने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारणा केली.
दरम्यान, हा पती एका कपड्यांच्या दुकानात काम करतो. त्याने दावा केला आहे की, तो त्या महिलेला ओळखत नाही. त्याने केवळ त्या महिलेला दुचाकीवरून 'लिफ्ट' दिली होती. तथापि, पत्नीला काही हे कारण पटले नाही. त्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे.
हा वाद इतका वाढला की, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. 5 मे रोजी करमना पोलिस ठाण्यात महिलेने तिच्या पतीवर आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला.
महिलेच्या जबाबाच्या आधारे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
रस्ता सुरक्षा प्रकल्पांतर्गत रस्त्यांवर कॅमेरे बसवण्याच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचारावरून केरळमध्ये आधीच राजकीय वाद सुरू आहे. त्यातून आता अशी मजेशीर प्रकरणेही समोर येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.