Kerala High Court: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सीरियल किलर जयनंदनला केरळ उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा एस्कॉर्ट पॅरोल दिला आहे. जयनंदनने लिहिलेले पुस्तक हे या निर्णयाचे कारण आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठीच त्याला पॅरोल देण्यात आला. जयनंदन याच्या मुलीने त्याला पॅरोल मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले. न्यायाधीशांनीही आपल्या निर्णयात मुलीचे कौतुक केले. 56 वर्षीय जयनंदन पाच खूनाच्या खटल्यांमध्ये शिक्षा भोगत आहे. केरळमधील त्रिशूर-एर्नाकुलमच्या आसपास त्याने या घटना घडवून आणल्या होत्या.
दरम्यान, जयनंदन जून 2013 मध्ये त्रिवेंद्रम मध्यवर्ती कारागृहातून फरार झाला होता. नंतर सप्टेंबर 2013 मध्ये तो पुन्हा पकडला गेला. याआधीही तो कन्नूर तुरुंगातून पळून गेला होता, मात्र पकडला गेला होता. त्याच्या पत्नीने पॅरोलसाठी याचिका दाखल केली होती. यासाठी त्याची मुलगी कीर्ती न्यायालयात हजर होती. पॅरोल मंजूर करताना न्यायाधीशांनी लिहिले की, हा निर्णय जयनंदन याची मुलगी आणि पत्नीसाठी दिला जात आहे. मुलगी आपल्या वडिलांवर खूप प्रेम करते. पुस्तक लाँचच्या वेळी तिच्या वडिलांनी उपस्थित राहावे अशी तिची इच्छा आहे. याआधी मार्चमध्ये त्याच्या मुलीच्या लग्नाला उपस्थिती राहता यावं यासाठी दोन दिवसांचा पॅरोल जयनंदनला मंजूर झाला होता.
न्यायालयाने पुढे म्हटले की, मुलीने वडिलांसाठी दिलेला कायदेशीर लढा कौतुकास्पद आहे. तिचे वडील पाच खूनांच्या विविध खटल्यांमध्ये दोषी आहेत, असे म्हणायला हरकत नाही. न्यायालयाने पुढे म्हटले की, आईप्रमाणे वडीलही आपल्या मुलांसाठी हिरो असतात. केवळ नववीपर्यंत शिकलेल्या जयनंदनने 17 वर्षे तुरुंगात असताना हे पुस्तक लिहिले, याचीही न्यायाधीशांनी दखल घेतली. जयनंदन यांच्या 'पुलारी विरियुम मुनपे' या पुस्तकाचे प्रकाशन 23 डिसेंबर रोजी एर्नाकुलम प्रेस क्लब येथे होणार आहे. आपल्या पुस्तकातून मिळणारे उत्पन्न गरजू मुलांना देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.