Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळ विद्यापीठात सीपीआयएम नेते जॉन ब्रिटास यांनी व्याख्यान दिल्याचा मुद्दा जोर धरत आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही या मुद्द्यावरुन सीपीआयएमवर निशाणा साधला आणि काही लोक कायदा मोडणे हा आपला हक्क मानत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी विद्यापीठाकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. विद्यापीठ परिसरात निवडणूक प्रचाराला पूर्ण बंदी आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनाने या बंदीकडे दुर्लक्ष करुन एखाद्याला बैठक घेण्यास परवानगी दिली तर मला याबाबत खुलासा मागावा लागेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे विद्यापीठ प्रशासनाने बैठक घेण्यास नकार दिला होता. आता निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी. समस्या अशी आहे की, काही लोक कायदा मोडणे हा त्यांचा हक्क मानतात. कायदा मोडून ते त्यांचा अजेंडा राबवतात. मला आशा आहे की, हे सर्व लवकरात लवकर थांबेल.''
सीपीआयएम नेते जॉन ब्रिटास यांनी नुकतेच केरळ विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित केले. विद्यापीठ कर्मचारी संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र हा कार्यक्रम निवडणूक आचारसंहितेचा भंग मानला जात आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार सरकारी संस्थांमध्ये निवडणूक प्रचार करता येत नाही. मात्र, हा सार्वजनिक कार्यक्रम नसून मासिक कार्यक्रम असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे. प्रकरण वाढल्यानंतर निवडणूक नोडल ऑफिसरने कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस बजावली. या नोटीसमध्ये नोडल ऑफिसरने आयोजकांकडे उत्तर मागितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.