Kedarnath Dham
Kedarnath DhamDainik Gomantak

Kedarnath Dham: बद्रीनाथ-केदारनाथमध्ये रिल्स बनवण्यावर बंदी, वाचा नेमकं प्रकरण काय?

मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिरामध्ये रिल्स आणि व्हिडिओ काढण्यावर बंदी आणली आहे.
Published on

Kedarnath Dham: केदारनाथ हे चार धामांपैकी सर्वात लोकप्रिय धाम आहे. येथे अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंसाठी आस्थेचं स्थान आहे. पाण वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी घातली आहे.

  • व्हिडिओ आणि रिल्स काढण्यावर बंदी

दरम्यान बद्रीनाथ-केदारनाथ धाममध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ काढण्यावर बंदी आणली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक आदेश जारी केला आहे, यानुसार मंदिर प्रशासनाकडून युट्यूब, इंस्टाग्राम रिल्स आणि कोणताही व्हिडिओ शुट करण्यावर कारवाइ करण्यात येणार. परिसरात मोबाइल बॅन करण्याच्या तयारीत आहे. यामुळे येथे येणारे भाविक आता मंदिर परिसरात मोबाईल वापरू शकणार नाही. परिसरात मोबाइल बॅन करण्याच्या तयारीत आहे. यामुळे येथे येणारे भाविक आता मंदिर परिसरात मोबाईल वापरू शकणार नाही.

Kedarnath Dham
Delhi News: 'पती रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडतो...,' महिलेचा धक्कादायक खुलासा
  • केदारनाथ मंदिरासमेर ब्रॉयफ्रेंडला प्रपोज

केदारनाथ मंदिरासमोरील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज करतांना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. तर अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच केदारनाथ मंदिर समिती सध्या अॅक्शन मोडनध्ये आली आहे.

  • व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे सांगितले जात आहे

सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत लोकांच्या भिन्न-भिन्न प्रतिक्रिया येत आहेत. धार्मिकस्थळी हा प्रकार योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, काही लोकांनी अशा व्हिडिओंचे वर्णन फक्त प्रेमळ आणि सुंदर असे केले आहे.

काही लोकांनी तर असे म्हटले आहे की, हे सर्व स्क्रिप्टेड आहे आणि फक्त व्हायरल होण्यासाठी केले आहे. यापूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्याला पाठीवर घेऊन केदारनाथ धामला पोहोचला होता.

त्याने आपल्या कुत्र्यासोबत भगवान नंदीच्या चरणांना स्पर्शही केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बराच वाद झाला होता.

  • मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मंदिर परिसरात युट्युब शॉट्स, व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवण्यावर बंदी घातली आहे. ज्यामुळे भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com