Kashmir Journalist Threatening : काश्मीरमध्ये पत्रकारांना धमक्या; 'या' दहशतवाद्याचं नाव आलं समोर

Kashmir Journalist Threatening Case : काश्मीरमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
Kashmir Journalist Threatening Case
Kashmir Journalist Threatening Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Kashmir Journalist Threatening Case : काश्मीरमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून येथे राहणाऱ्या पत्रकारांना दहशतवादी धमक्या येत होत्या, त्याबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.

ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांत इथल्या अनेक पत्रकारांना मिळालेल्या धमक्यांमागे तुर्की दहशतवादी मुख्तार बाबा आणि जम्मू-काश्मीरमधील त्याच्या सहा साथीदारांचा हात असल्याचा संशय आहे. एका गुप्तचर दस्तऐवजातून ही माहिती मिळाली आहे. (Kashmir Journalist Threatening Case )

Kashmir Journalist Threatening Case
Rampur पोटनिवडणुकीपूर्वी आझम खान यांना झटका, मतदार यादीतून नाव वगळण्याचा आदेश

अनेक पत्रकारांनी राजीनामे दिले होते

लश्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) कडून धमक्या मिळाल्यानंतर अनेक पत्रकारांनी अलीकडेच स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिकांमधून राजीनामा दिला.

गुप्तचर दस्तऐवजानुसार, "प्राथमिक मूल्यांकनानुसार असे सूचित होते की दहशतवादी मुख्तार बाबा या धमक्यांच्या मागे आहे." मुख्तार बाबा (55) काश्मीरमधील विविध वृत्तपत्रांसाठी काम करत होता. 1990 च्या दशकात तो श्रीनगरचा रहिवासी होता आणि तो तुर्कीला पळून गेल्याचे समजते.

दस्तऐवजात असे म्हटले आहे की तो वारंवार पाकिस्तानला जातो, तो मुख्य सूत्रधार आहे जो खोऱ्यातील तरुणांना TRF मध्ये सामील होण्यासाठी "प्रेरित" करतो. तो इथल्या त्याच्या सहा साथीदारांच्या संपर्कात असल्याचा संशय असून त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे.

काश्मीरमध्ये यापूर्वी टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी खास काम केले आहे. यामुळेच दहशतवाद्यांकडून धमक्या आल्यावर अनेक पत्रकारांनी नोकरी सोडली. सध्या लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com