Rampur पोटनिवडणुकीपूर्वी आझम खान यांना झटका, मतदार यादीतून नाव वगळण्याचा आदेश

Samajwadi Party Leader Azam Khan: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना आणखी एक धक्का बसला आहे.
Azam Khan
Azam KhanDainik Gomantak

Samajwadi Party Leader Azam Khan: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना आणखी एक धक्का बसला आहे. रामपूरमधील मतदार यादीतून आझम खान यांचे नाव वगळण्याचा आदेश जारी करण्यात आला असून, त्यानंतर ते पोटनिवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत. आझम खान यांच्याविरोधात निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांचे विधानसभा सदस्यत्वही गेले आहे.

आकाश सक्सेना यांच्या तक्रारीवरुन कारवाई

रामपूर पोटनिवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार आकाश सक्सेना (Akash Saxena) यांनी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 16 अन्वये ही कारवाई केली आहे. आरपी कायद्याचा हवाला देत आझम खान यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याची मागणी करण्यात आली होती. आझम खान यांना सुनावलेल्या शिक्षेचा हवाला देण्यात आला आहे.

Azam Khan
Hate Speech Case: आझम खान यांची गेली आमदारकी, सभापतींनी रद्द केले सदस्यत्व

तसेच, आकाश सक्सेना यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील विविध तरतुदींचा हवाला देत आझम यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. निवडणूक नोंदणी अधिकारी, रामपूर विधानसभा मतदारसंघाने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, "तक्रारदार, आकाश सक्सेना यांच्या अर्जासह, न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती आणि मतदार यादीतून आझम खान यांचे नाव वगळण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि 1951."

दुसरीकडे, 27 ऑक्टोबर रोजी रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांना प्रक्षोभक भाषणासाठी तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.

Azam Khan
Azam Khan: द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

रामपूरमध्ये पोटनिवडणूक का होत आहे?

द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी आझम खान यांना नुकतीच तीन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, त्यामुळे रामपूर विधानसभा जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) असीम राजा यांना तिकीट दिले आहे. त्यांनी गुरुवारी फॉर्म भरला. यावेळी त्यांच्यासोबत रामपूरचे माजी आमदार आझम खानही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com