Karnataka: बहिणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी, चाकूने 70 वार करत तरुणाची हत्या

Karnataka Crime: बहिणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याची हत्या केल्याची घटना कर्नाटकात घडलीये.
 Crime
Crime Dainik Gomantak

Karnataka Crime: बहिणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याची हत्या केल्याची घटना कर्नाटकात घडलीये. हत्या करणारा तरुण अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून नंदन असे मयत तरुणाचे नाव आहे. नंदन हा परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीला त्रास देत होता. या वादातूनच मुलीच्या भावाने मित्राच्या साथीने तब्बल 70 वेळा वार करत नंदनची हत्या केली.

दरम्यान, चिकबल्लापूर येथे राहणारा नंदन (वय 19) कपड्यांच्या कंपनीत कामाला होता. त्याचे तिथेच राहणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो सातत्याने तिला फोन करायचा. शेवटी तिने कटांळून नंदनचा नंबर ब्लॉक केला. यानंतरही नंदन तिला त्रास देत होता. आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो पीडितेला द्यायचा. मुलीच्या कुटुंबीयांनी नंदनला याबाबत समजही दिली होती. मात्र, नंदनने तिला त्रास देणे थांबवले नाही. अखेर तिच्या भावाने नंदनच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतली.

 Crime
Jammu Kashmir: अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर , जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

दुसरीकडे, आरोपी (Accused) तरुण आणि मित्राने आधी चाकू खरेदी केला. यानंतर दोघेही नंदनच्या फॅक्टरीजवळ गेले. कामासंदर्भात बोलायचे आहे असे सांगत त्यांनी पहिल्यांदा नंदनला बोलावले. त्यानंतर ते नंदनला घेऊन शहराजवळील टेकडीवर गेले. जाताना त्यांनी दारु देखील विकत घेतली होती.

 Crime
jammu kashmir: जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाचा पराक्रम; दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना अटक

तसेच, टेकडीवर पोहोचल्यावर आश्रय आणि आरोपीने नंदनकडे बहिणीचा विषय काढला. माझ्या बहिणीला का त्रास देतो, असा जाब विचारत आरोपीने नंदनवर चाकूने हल्ला केला. त्यांनी नंदनवर तब्बल 70 वार केले गेले. या हल्ल्यात नंदनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींना अटक केली. मुलीचा भाऊ आणि आश्रय हे दोघे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com