Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाच्या मागणीने पुन्हा धरला जोर; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट!

Karnataka MPs: कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कर्नाटकाच्या खासदारांनी ही मागणी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाच्या मागणीने पुन्हा धरला जोर; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट!
Karnataka MPs demand Railway Minister Ashwini Vaishnav to merge Konkan Railway Corporation with Indian RailwaysDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कर्नाटकाच्या खासदारांनी ही मागणी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

कर्नाटकातील उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, उडुपी-चिकमंगळूरचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी, दक्षिण कन्नडचे खासदार कॅप्टन ब्रिजेश चोवटा यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, अशी जोरदार मागणी केली. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली असून आता विलीनीकरणाच्या दिशेने पावले टाकण्यात येतील, असे रेल्वे मंत्र्यांनी त्यांना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाच्या मागणीने पुन्हा धरला जोर; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट!
Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वे भरतीसाठी मुदतवाढ! शेवट तारीख २१ ऑक्टोबर; गोमंतकीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन

कर्नाटकातून अशा प्रकारचे प्रयत्न होत असताना गोवा आणि महाराष्ट्रातील खासदारांनी मात्र आपली भूमिका उघड केलेली नाही. गोवा आणि महाराष्ट्राचाही महामंडळात आर्थिक वाटा आहे. कोकण रेल्वेचा सर्वांगीण विकास व्हायचा असल्यास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा लाभ महाराष्ट्र, गोवा (Goa), कर्नाटकाच्या किनारी भागाला व्हायचा असल्यास कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशा आशयाचे निवेदन या खासदारांनी रेल्वेमंत्र्यांना सादर केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाच्या मागणीने पुन्हा धरला जोर; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट!
Konkan Railway: कोकण रेल्वेचं दुपदरीकरण बारगळलं; महामंडळासमोर निधी उभारण्याचा प्रश्न; रेल्वे मंडळांनं फिरवली पाठ

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र (Maharashtra), गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्य शासनाचे कोकण रेल्वेतील समभाग विकत घेऊन कोकण रेल्वे विलीन करून घ्यावी, अशी मागणी या खासदारांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com