Possibility of Meat shortage in Goa due to Karnataka government's ban on animal slaughter
Possibility of Meat shortage in Goa due to Karnataka government's ban on animal slaughter

कर्नाटक सरकारने जनावरांच्या कत्तलींवर बंदी घातल्याने गोव्यात मांसाची कमतरता भासणार?

Published on

पणजी :  कर्नाटक सरकारने जनावरांच्या कत्तलींवर बंदी घातल्याने कर्नाटकातून गोव्यात येणारे मांस बंद होणार असल्याने गोव्यात मांसाची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे मांस दरातही मोठी वाढ होणार आहे. गोमंतकीयांना पुरेसे आणि वाजवी दरात मांस उपलब्ध करण्याची कोणतीही योजना राज्य सरकारकडे नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी केली.

 ट्रोजन डिमेलो म्हाणाले, गोव्यातील एकमेव कत्तलखाना सरकारने मुद्दाम बंद ठेवला आहे. आता कर्नाटकातून येणारे मांसही बंद होणार आहे. जनतेने काय खावे यावरही असे सरकारी निर्बंध आता लागू झाले आहेत. गोव्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती समुदायाच्या अंतर्गत व्यवहारात हा सरकारी हस्तक्षेप आहे. यातून राज्यातही हेच धोरण राबविण्याचा सरकारचा हेतू आहे. कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक पशुधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन विधेयक विधानसभेत सादर करून मंजूर केले आहे.  

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com