Karnataka High Court: पाकिस्तानी पिता-भारतीय मातेच्या पोटी जन्मलेल्या मुलांना हवं भारतीय नागरिकत्व; कोर्टाने म्हटलं...

Karnataka High Court: न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुलांना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.
Karnataka High Court
Karnataka High CourtDainik Gomantak

Karnataka High Court: पाकिस्तानी पिता आणि भारतीय मातेच्या पोटी जन्मलेल्या आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना कायदेशीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

खरेतर, न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुलांना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

पाकिस्तानचे नागरिकत्व सोडण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण करण्याचा कायदा 2 अल्पवयीन मुलांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अडथळा बनला आहे. ही दोन्ही मुलं सध्या बंगळुरुमध्ये त्यांच्या आईसोबत राहत आहेत.

अमिना 2021 मध्ये बंगळुरुला परतण्याचा निर्णय घेते

या प्रकरणी बुधवारी न्यायालयाने निकाल दिला. रिपोर्ट्सनुसार, 2002 मध्ये बंगळुरुच्या अमिना राहिलने दुबईमध्ये असद मलिक या पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केले, जिथे तो स्थायिक झाला होता.

मात्र, 2014 मध्ये दुबईच्या (Dubai) कोर्टात दोघांचा घटस्फोट झाला आणि दोन्ही मुलांचा ताबा अमीनाला मिळाला. 2021 मध्ये, अमीनाने तिच्या 17 आणि 14 वर्षीय दोन मुलांसह बंगळुरुमध्ये तिच्या आईच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

अमिना ही भारतीय नागरिक असली तरी मुलांचे वडील पाकिस्तानी असल्याने ते पाकिस्तानी नागरिक आहेत.

Karnataka High Court
Punjab And Haryana High Court: अमृतपाल सिंग प्रकरणी न्यायालय सक्त, '80 हजार पोलिस असताना...

दूतावासाने मानवतावादी आधारावर पासपोर्ट जारी केला

आपल्या मुलांना भारतात (India) आणण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांचा सामना करत अमीनाने दुबईतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता.

जुने पासपोर्ट पाकिस्तानी दूतावासात जमा केल्यानंतर दूतावासाने मानवतेच्या आधारावर मुलांना तात्पुरता पासपोर्ट दिला होता.

तात्पुरत्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर आता मुलांना भारतीय नागरिकत्व घेणे आवश्यक झाले आहे.

अमिना आणि तिच्या कुटुंबीयांनी तात्पुरत्या पासपोर्टची मुदत वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता, मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com