Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाचे 'बजरंगी' फेल, काँग्रेसची 'जय'; मोदींचा रोड शो तारु शकला नाही

काँग्रेसची मुसंडी; 130 जागांकडे आगेकूच
Karnataka Election Result 2023: PM Narendra Modi | Rahul Gandhi
Karnataka Election Result 2023: PM Narendra Modi | Rahul Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Election Result 2023: दक्षिण भारतातील भाजपच्या विजयाचे द्वार म्हणून कर्नाटककडे पाहिले जात होते. तथापि, यंदाच्या विधानसभा निवडणुकीने भाजपला कर्नाटकात धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे स्टार प्रचारक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देखील कर्नाटकात भाजपची सत्ता वाचवू शकलेला नाही.

Karnataka Election Result 2023: PM Narendra Modi | Rahul Gandhi
Karnataka Election Result 2023: 'आय अ‍ॅम अनस्टॉपेबल'... म्हणत काँग्रेसने शेअर केला राहुल गांधींचा व्हिडिओ

पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी कर्नाटकात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. पक्षाचे सर्व फायरब्रँड नेते भाजपसाठी कर्नाटकात कार्यरत होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकसाठी निवडणूक प्रचारात मोठे योगदान दिले होते.

एकहाती सत्ता मिळवून देणारे नेते अशी मोदींची प्रतिमा आहे. मोदी भाजपचा 'फेस' आहेत. मोदींवर अजूनही लोकांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे मोदींच्या सभांना गर्दीही झाली. मात्र राष्ट्रीय मुद्यांपेक्षा स्थानिक मुद्देच कर्नाटकात प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.

मोदींनी कर्नाटकात एकूण 19 सभा घेतल्या होत्या. तर एकूण 6 रोड शो देखील केले होते. या सर्व सभा आणि रोड शो यांना कर्नाटकात मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता. पण, या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झालेले दिसत नाही. भाजपची संख्या मात्र 104 वरून यंदा 70 च्याही खाली घटताना दिसत आहे.

एरवी भाजपचा कुठल्याही राज्यामध्ये विजय झाला तर तो मोदी-शाह यांचा विजय आहे, असे भाजपकडून सांगितले जाते. तथापि, आता मात्र भाजपचा कर्नाटकातील हा पराभव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाचा पराभव असणार आहे.

भाजपच्या जागा घटताना दिसत असून काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र चांगली वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील सर्व 224 जागांवर कल स्पष्ट झाले असून काही ठिकाणचे निकालही हाती आले आहेत. त्यातून भाजपची पिछाडी स्पष्टपणे दिसून येत आहे.

Karnataka Election Result 2023: PM Narendra Modi | Rahul Gandhi
Karnataka Election Result 2023: काँग्रेस 136 जागा जिंकण्याची शक्यता; 82 जागांवर विजय, तर 54 जागांवर आघाडी

भाजपचे कर्नाटकातील महत्वाचे नेते येडीयुरप्पा हे महत्वाचे लिंगायत नेते आहेत. कर्नाटकात लिंगायत आणि वोक्कलिग हा मोठा समुदाय आहे. तथापि, यंदा लिंगायत बहुल जागांवर काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसून येत आहे.

येडीयुरप्पा फारसे सक्रीय नसणे, हे देखील यामागचे कारण असू शकते. येडीयुरप्पांना हटवून भाजपने बोम्मई यांना मुख्यमंत्री केले होते.

भारत जोडो यात्रेपासून काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांमध्ये थेट मिसळत आहेत. कर्नाटकच्या प्रचारातही राहुल गांधींनी हीच स्ट्रॅटेजी फॉलो केली. सर्वसामान्यांसोबत बसमधून प्रवास, हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट किंवा जेवण, विद्यार्थी-विद्यार्थिनींशी चर्चा... इत्यादींमधून राहुल गांधींनी सर्वसामान्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींच्या या प्रयत्नालाही यश आल्याचे या निकालातून म्हणता येऊ शकते. काँग्रेसने कर्नाटकात 130 जागा जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

भाजपने गेल्या काही काळात देशभरात विविध राज्यांमध्ये यश मिळवले आहे. जिथे भाजपला निवडणुकीतून यश मिळाले नाही, किंवा जिथे काठावरचे बहुमत होते तिथे विविध खटपटी करून, साम दाम दंड भेद ही आयुधे वापरून भाजपने सत्ता स्थापन केली होती.

तथापि, कर्नाटकात सध्या ती शक्यता दिसून येत नाहीय. दरम्यान, आता कर्नाटकातील या काँग्रेसच्या यशानंतर या राज्यामध्ये ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभाग सक्रिय होणार का, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com