रामचंद्र गुहांच्या 'गांधी नंतर भारत' पुस्तकावर बंदी घालण्याची कर्नाटकातून होतेय मागणी

या पुस्तकामध्ये आध्यात्मिक नेते आणि समाज सुधारक नारायण गुरु (Social Reformer Narayan Guru) यांचा अपमानजनक उल्लेख करण्यात आल्याचा दावा या संताकडून करण्यात आला.
Historian Ramchandra Guha
Historian Ramchandra GuhaDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील (Karnataka) आर्य इदिगा समाजातील (Arya Idiga) एका संताने रविवारी इतिहासकार रामचंद्र गुहा (Historian Ramchandra Guha) यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. आणि गुहांच्या 'इंडिया अफ्टर गांधी' (India after Gandhi) या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. या पुस्तकामध्ये आध्यात्मिक नेते आणि समाज सुधारक नारायण गुरु (Social Reformer Narayan Guru) यांचा अपमानजनक उल्लेख करण्यात आल्याचा दावा या संताकडून करण्यात आला असून गुहा यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

ते म्हणाले की, गुहा यांनी नारायण गुरूंचे वर्णन एका समाजाचे नेते म्हणून केला आहे. ते पुढे म्हणाले की, 2007 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात समाजाचे वर्णन अग्रणी जातींच्या तुलनेत दुय्यमरित्या केले आहे. तक्रारीत असे म्हटले आहे, "यामुळे आर्य इदिगा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि आम्ही गुहांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करतो."

Historian Ramchandra Guha
मणिपूरचे नवे राज्यपाल म्हणून एल. गणेशन यांची राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

नारायण गुरुंची स्तुती पुस्तकात: गुहा

रामचंद्र गुहा यांनी आरोप फेटाळताना सांगितले की, मी नारायण गुरूंची स्तुती केली होती. "गांधी नंतर भारत" हे पुस्तक त्यासाठी वाचा. त्याच्यामध्ये मी नारायण गुरुंची स्तुतीच केली आहे. 'गांधी: द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' हे देखील वाचा ज्यात मी समाज सुधारक म्हणून नारायण गुरूंच्या उल्लेखनीय योगदानाचा उल्लेख केला आहे.

Historian Ramchandra Guha
Rajasthan: निवडणूक आयोगाच्या विचित्र अटींमुळे प्रादेशिक पक्ष निवडणुका लढण्यास असमर्थ

गुहा यांनी या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीचा लेखाजोखा आणि विश्लेषण ठेवले आहे. ज्यात विविध क्षेत्रातील सामाजिक आणि राजकीय विविधता आणि भारताच्या अस्तित्वाची कथा संदर्भाने वर्णन केले आहे. फाळणी आणि निर्वासितांची समस्या, महात्मा गांधींची हत्या, स्वतंत्र राज्यांचे अस्तित्व, सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया, दक्षिणेकडील राज्यांचे आव्हान, जम्मू -काश्मीर यासह अनेक विषयांचा समावेश या पुस्तकात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com