Karnataka HIV Alert: "7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

7000 Students Tested Positive HIV Karnataka: नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (NACO) अहवालानुसार, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, राज्यात सध्या सुमारे 2.60 लाख लोक एचआयव्हीसह जगतात.
7000 Students Tested Positive HIV
7000 HIV cases in Karnataka education institutionsDainik Gomantak
Published on
Updated on

7000 Students Tested Positive HIV Karnataka: कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे एचआयव्ही तपासणी आणि मोफत समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या विशेष निर्देशानंतर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (NACO) अहवालानुसार, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, राज्यात सध्या सुमारे 2.60 लाख लोक एचआयव्हीसह जगतात. यापैकी 54 हजारांहून अधिक लोकांना आपल्याला हा संसर्ग झाला याची कल्पनाही नाही. विशेष म्हणजे, हीच आरोग्य खात्याची सर्वात मोठी चिंता ठरली.

7000 Students Tested Positive HIV
Karnataka Madayi Water Project: कर्नाटकला केंद्राचा मोठा धक्का! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत म्हादई प्रकल्पाची मंजुरी स्थगित

आरोग्य विभागाच्या चिंताजनक आकडेवारीनुसार, 18 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये एचआयव्हीचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. 2023-24 मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या 44,500 होती, जी 2025-26 मध्ये वाढून तब्बल 66,600 वर पोहोचली. इतकेच नाही तर 18 ते 25 वयोगटातील 7 हजारांहून अधिक कॉलेज विद्यार्थ्यांना नव्याने एचआयव्हीची लागण झाल्याचे उघडकीस आले. यामुळे विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्या सर्व संलग्न इंजिनिअरिंग कॉलेजेसना 'मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा' कार्यक्रमांतर्गत एकात्मिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले. या अभियानात एचआयव्हीसोबतच हिपॅटायटिस-बी आणि सिफिलीससारख्या गंभीर आजारांबद्दल जागरुकता निर्माण केली जाईल.

7000 Students Tested Positive HIV
Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

तसेच, महाविद्यालयांमध्ये चालणाऱ्या या मोहिमेबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले की, एचआयव्ही चाचणी कोणत्याही विद्यार्थ्यासाठी सक्तीची नसेल; ती पूर्णपणे ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांची ओळख आणि तपासणी रिपोर्ट पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी KSAPS ने 'QR कोड आधारित सेल्फ-रिस्क असेसमेंट टूल' देखील तयार केले.

7000 Students Tested Positive HIV
Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

VTU चे कुलगुरु एस. विद्याशंकर यांनी आश्वासन दिले की, कोणत्याही विद्यार्थ्याला अजिबात संकोच किंवा अडचण वाटणार नाही अशा संवेदनशील पद्धतीने ही शिबिरे जुलै 2026 पासून पुढील आठ महिने टप्प्याटप्प्याने चालवली जातील. 12 ऑगस्ट रोजी 'युवा दिनाचे' औचित्य साधून फ्लॅश मॉब, पथनाट्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीतील एचआयव्हीशी संबंधित सामाजिक गैरसमज दूर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tillari Water Diversion
Karnataka Supreme Court Cases
Karnataka Stolen Gold Case
 Kannada Medium Schools Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com