Karnataka CM Basavaraj Bommai's car: कर्नाटक निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवून झडती घेतली. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका मंदिरात जात असताना ही घटना घडली. निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (31 मार्च 2023) या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. राज्यात 10 मे रोजी निवडणुका होणार असून आचारसंहिता लागू आहे.
अधिकाऱ्यांनी बोम्मई यांच्या वाहनाची तपासणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोम्मई खासगी कारमधून घाटी सुब्रमण्य मंदिराकडे जात होते. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दिवशी बुधवारी त्यांनी त्यांची अधिकृत गाडी परत केली. त्यांनी सांगितले की, त्यांची गाडी होसाहुड्या पोस्टवर थांबवून झडती घेतली. वाहनात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही आणि अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली, असे सूत्रांनी सांगितले.
कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार असून, 13 मे रोजी निकाल लागणार आहे, मात्र त्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तरा कन्नडमधील कुडलिगी विधानसभेचे आमदार एन वाय गोपालकृष्ण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे गोपाळकृष्ण निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपालकृष्ण यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन राजीनामा सादर केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी अलीकडेच कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची भेट घेतली.
गोपालकृष्ण 1997, 1999, 2004 आणि 2008 मध्ये काँग्रेसकडून आमदार राहिले आहेत. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीला भाजपचे दोन आमदार पुत्तण्णा आणि बाबुराम चिंचनसूर यांनीही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी भाजपचा राजीनामा दिला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील 224 विधानसभा जागांवर मतदानासाठी 58,282 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 883 मतदार असतील. त्याच वेळी, महिला अधिकारी 1320 मतदारांशी जोडलेल्या मतदान केंद्रांचे व्यवस्थापन करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.