Karnataka Assembly Elections 2023: बेंगळुरूमध्ये PM मोदींच्या रोड शोची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ

आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
Karnataka Assembly Elections 2023:
Karnataka Assembly Elections 2023: Dainik Gomantak

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूने जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, बेंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी केलेली जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. हे दृश्य इंदिरानगरमधील असुन वाद्य वाजतांना काही लोक दिसत आहेत.

Karnataka Assembly Elections 2023:
Goa Petrol-Diesel Price: टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या इंधनाचे दर; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या फेरीत नरेंद्र मोदी (PM Modi) बंगळुरूमध्ये 36 किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत. पीएम मोदींचा हा मेगा रोड शो दोन भागांत विभागला गेला आहे.

यापैकी एक म्हणजे 26 किमी लांबीचा रोड शो (6 मे) ला पार पडला. तसेच, आज (7 मे) दुसरा 10 किमी लांबीचा रोड शो होणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान शिवमोग्गा (Shivamogga) आणि म्हैसूर (Mysuru) येथे दोन जाहीर सभा घेणार आहेत.

  • कर्नाटकात आज प्रचाराचा धुरळा

भाजपच्यावतीने मोदी बंगळुरूमध्ये असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेलगावी आणि इतर भागात असतील. शाह येथे एकूण 4 रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

काँग्रेसही प्रचारात मागे नाही. काँग्रेसच्या वतीने पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज बंगळुरूमध्ये असतील, जिथे ते दोन ठिकामी कॉर्नर सभा घेणार आहेत आणि प्रियंका गांधींसोबत रोड शो देखील करणार आहेत. याशिवाय प्रियांका दोन रोड शो आणि दोन जाहीर सभा घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com