कानपूर हिंसाचारात पोलिसांची मोठी कारवाई, 40 संशयितांचे पोस्टर केले जारी

कानपूरमध्ये (Kanpur) 3 जून रोजी गोंधळ घालणाऱ्या लोकांच्या अटकेचा वेग वाढला आहे.
40 Suspects
40 SuspectsTwitter/ @ANINewsUP
Published on
Updated on

Kanpur Violence: कानपूरमध्ये 3 जून रोजी गोंधळ घालणाऱ्या लोकांच्या अटकेचा वेग वाढला आहे. सोमवारी कानपूर पोलिसांनी हिंसक चकमकीत सहभागी असलेल्या 40 संशयितांची पोस्टर जारी केली आहेत. कानपूर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज स्कॅन केल्यानंतर या संशयितांची छायाचित्रे जारी केली. पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. याशिवाय माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांनी माहिती देण्यासाठी इन्स्पेक्टर बेकनगंज यांचा मोबाईल क्रमांक (9454403715) देखील जारी केला आहे. (Kanpur police has released posters of 40 suspects involved in the violent encounter)

दरम्यान, हिंसाचाराचा आरोप असलेल्यांची छायाचित्रे असलेली होर्डिंग्ज महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येण्याची ही तिसरी वेळ आहे. 2015 मध्ये सिसामाऊमध्ये पहिल्यांदा असे होर्डिंग लावण्यात आले होते. डिसेंबर 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधादरम्यानही अशीच कारवाई करण्यात आली होती. मार्च 2020 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना होर्डिंग हटवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारची ही कृती संविधानाच्या (Constitution) कलम 21 चे उल्लंघन आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचे मानले होते.

40 Suspects
Patiala violence: पटियाला हिंसाचारप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक

आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे

कानपूरचे सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, 'आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या पेट्रोल पंपावरुन उघड्यावर पेट्रोल टाकण्यात आले त्या पेट्रोल पंपावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.' ते पुढे म्हणाले की, 'आम्ही अद्याप कोणतेही पोस्टर रिलीज केलेले नाही. पोलीस (Police) या छायाचित्राची ओळख पटवत आहेत. जर ते सापडले नाही तर ते सोडेल जाईल.'

सपा नेते निजाम कुरेशी यांचे नाव पुढे आले

एफआयआरमध्ये निजाम कुरेशी यांचे नाव आहे. निजाम कुरेशी हे जोहर फॅन्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. ते समाजवादी पक्षाचे नेते असल्याचेही बोलले जात आहे. निजामने सपा नेत्यांसोबतचे फोटोही फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यात त्यांची मेट्रोपॉलिटन सेक्रेटरी, एसपी कानपूर अशी वर्णी लागली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अखिल भारतीय जमीयतुल कुरेशी कृती समितीचे जिल्हाध्यक्षही असल्याचे सांगितले जात आहे. काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com