Kangana Sharma: पोज घेण्याच्या नादात मोठी चूक, अभिनेत्रीचा पाय घसरला आणि…, नेटकरी म्हणाले, "ओव्हरएक्टिंग"

Kangana Sharma: अभिनेत्री कंगना शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kangana Sharma
Kangana SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Kangana Sharma Viral Video

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्री त्यांच्या फॅशन निवडींमुळे अनेकदा चर्चेत राहतात. त्यांची स्टाईल अनेकदा त्यांच्या सुंदरतेत भर घालत असली तरी, कधीकधी हे स्टायलिश लूक त्यांना अडचणीत देखील आणू शकतात.

अलिकडेच अभिनेत्री कंगना शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंगना शर्मा मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर पोज देत होती. तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता व त्यावर हाय हील्स घातल्या होत्या.

पोज देताना अचानक तिचा तोल गेला आणि जोरात खाली पडली. कंगनाचा पायऱ्यांवरून पडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kangana Sharma
Titeeksha Tawade In Goa: मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTOS

व्हायरल व्हिडीओमध्ये कंगना पायऱ्यांवर उभी राहून पोज देत असते. नंतर एक पाऊल पुढे टाकताच, ती हाय हील्समुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते.

ती पडल्यावर तिला उचलण्यासाठी तेथील उपस्थित लोक येतात. त्यानंतर कंगना पाय धरून पायऱ्यांवर बसलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Kangana Sharma
Goa Politics: मडकईकरांच्या आरोपांवरून उत्पल यांचे बाबूशकडे बोट, मोन्‍सेरात यांचा पलटवार; नेत्यांसह मंत्र्यांचा सावध पवित्रा

खरं तर कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या आउटफिटवर लोक खूप कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती अतिशय छोट्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ज्यानंतर लोक त्याची उर्फी जावेदशी देखील तुलना करत आहेत.

एका यूजरनं लिहिलं की, 'एवढ्या उंच हील्स कशा घालता?' तर अजून एका युजरनं जे झालं ते बरोबर आहे, अशी कमेंट केली आहे. एकानं ती ओव्हरएक्टिंग करत असल्याचं म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com