जम्मू-काश्मीरमध्ये नमाजानंतर मशिदीबाहेर सुरक्षा दलांवर दगडफेक

पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
jammu kashmir eid ul fitr stone pelting on security forces jawans outside mosque at anantnag
jammu kashmir eid ul fitr stone pelting on security forces jawans outside mosque at anantnag Dainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात मंगळवारी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र याचदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये असलेल्या मशिदीबाहेर सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली आहे. नमाजानंतर ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अनंतनाग येथील मशिदीत मंगळवारी ईदची नमाज अदा केल्यानंतर काही आंदोलक रस्त्यावर आले होते आणि काश्मीरबाबत घोषणाबाजी करण्यात आली होती.

jammu kashmir eid ul fitr stone pelting on security forces jawans outside mosque at anantnag
देशात गेल्या 24 तासात अडीच हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण

यादरम्यान या समाजकंटकांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य करत दगडफेक करण्यात आली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

देशात ईदचा सण सुरू असतानाच राजस्थानमध्येही दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आहे. सोमवारी रात्री जोधपूरच्या जालोरी गेटवर दोन गट समोरासमोर आले. यानंतर रात्री दगडफेकीची घटनाही समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण हाताळले होते. दुसरीकडे, मंगळवारी सकाळी ईदची नमाज अदा केल्यानंतर परिसरातील परिस्थिती पुन्हा बिघडली. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com