Army TES 46 Recruitment 2021: जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण असाल आणि भारतीय सैन्याचा भाग बनू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (TES) अंतर्गत जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या TES-46 च्या अभ्यासक्रमासाठी 90 पदांची भरती करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवार www.joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कराच्या भर्ती पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 8 नोव्हेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे. याशिवाय, केवळ अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) म्हणजेच जेईई मेन 2021 ची परीक्षा दिलेले उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात.
याशिवाय बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत किमान 60 टक्के गुण मिळवलेले उमेदवारच या भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16½ वर्षांपेक्षा कमी आणि 19½ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज कसा करावा -
TES-46 साठी अर्ज करण्यासाठी, भारतीय सैन्याच्या भर्ती पोर्टलला भेट द्या, joinindianarmy.nic.in.
यानंतर, होम पेजला दिलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज / लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा.
नवीन पेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करून आपल्या नावाची नोंदणी करा.
मागितलेल्या तपशीलामुसार (आधार क्रमांक, नाव, वडील/पालक नाव, आईचे नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाईल नंबर) भरून सबमिट करा.
त्यानंतर तुमच्या ईमेल आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
या सगळ्या प्रोसेस नंतर उमेदवार TES-46 साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.