जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील डी.एच. पोरा भागात दहशतवाद्यांसोबत (Terrorist) सुरक्षा दलांची चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir) सांगितले की, पोलीस आणि लष्कर संयुक्तपणे कारवाईत गुंतले आहेत. तत्पूर्वी, कुपवाडा पोलिसांनी लोलाब परिसरात लष्करासोबत संयुक्त दहशतवादविरोधी अभियान सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवादी शौकत अहमद शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कुपवाडा येथील लोलाब भागात ऑपरेशन सुरू केले, त्यानंतर चकमक झाली. (Jammu and Kashmir | Encounter underway in DH Pora area of Kulgam)
काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, विविध ठिकाणी शोध घेत असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला, ज्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. अटक करण्यात आलेला दहशतवादीही जाळ्यात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानी नागरिक अशी झाली
पोलीस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून करण्यात आली आहे, जो प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. ते म्हणाले की, अटक केलेल्या दहशतवाद्यासोबत आणखी दोन-तीन दहशतवादी या सुरू असलेल्या चकमकीत अडकले आहेत.
खोऱ्यात सतत चकमकी
तीन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख हिजबुल मुजाहिद्दीनचा जुनैद आणि बासित भट अशी आहे. गेल्या वर्षी अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच रसूल दार, त्यांची पत्नी आणि एका पंचाच्या हत्येत दहशतवादी बासितचा हात होता. याआधी कुलगाममधील मिशीपुरा भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. कुलगामच्या मिशीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी दहशतवादविरोधी अभियान सुरू केले.
आतापर्यंत शेकडो दहशतवादी मारले गेले
शोपियान जिल्ह्यातील कांज्युलर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी मारले गेले, त्यापैकी बँक व्यवस्थापक हत्येत सामील होता. सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑलआउट चालवले आहे, ज्याअंतर्गत आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.