सरकारच्या कामांविषयी लिहीत नाही; पत्रकारावर PSA गुन्हा दाखल

जम्मू काश्मीर प्रशासनाने सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो म्हणून 29 वर्षीय पत्रकाराविरोधात PSA गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच पत्रकार संरक्षण समितीने पत्रकाराच्या सुटकेची मागणी केली आहे.
Sajjad Gul
Sajjad GulDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमधील 29 वर्षीय पत्रकार सज्जाद गुल यांना प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (PSA) 5 जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. जम्मू यानंतर त्यांची रवानगी जम्मूच्या कोल बकवाल तुरुंगात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकाराची कृती भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मतेच्या विरोधात आहे. सज्जाद गुल असं या पत्रकाराचं नाव आहे.

Sajjad Gul
Corona Positive: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना झाली कोरोना लागण

सज्जाद गुल यांच्यावर देशविरोधी घोषणांसह आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोपही केला आहे. आता पोलिसांनी सज्जादवर PSA अंतर्गत लावलेल्या आरोपांची प्रत समोर आली आहे. ज्यामध्ये गुल सरकारच्या विरोधात जास्त वार्तांकन करत असे. तो उच्च शिक्षित असून तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांना सरकारविरोधात भडकाऊ शकतो.असा अजब युक्तीवाद काश्मीर प्रशासनाने केलाय.

सज्जाद ने सरकारविरोधी निषेधाचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना अटक केली . त्यानंतर अनेक पत्रकार संघटनांनी पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. सज्जाद गुल यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी न्यूयॉर्कस्थित कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (Journalist) ने पत्रकार भारत सरकारकडे केली.

माध्यमांनुसार गुलने सोशल मीडियावर (Social Media)नेहमीच वादग्रस्त ट्विट केले असल्याचे लिहिले आहे. एक पत्रकार म्हणून तुम्ही केंद्रशासित प्रदेशाच्या धोरणांवर नकारात्मक टीका करता, नेहमी राष्ट्र-विरोधी आणि असामाजिक तसेच, वस्तुस्थिती न तपासता ते लोकांना सरकारविरोधात भडकवण्यासाठी ट्विट करतात. गुल अनेकदा राष्ट्राला नुकसान होईल असे मुद्दे मांडतात.

सज्जाद गुलचे ट्विटरवर 10 हजार फॉलोअर्स आहेत. PSA डॉजियरमध्ये असेही म्हटले आहे की, माननीय न्यायालयाकडून सज्जाद गूल यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे झाल्यास शांततापूर्ण वातावरण आणि सुव्यवस्थेसाठी ते घातक ठरेल. त्यांची सुटका केवळ बांदीपोरा क्षेत्रासाठीच नाही तर संपूर्ण खोऱ्यासाठी धोक्याची ठरेल.

Sajjad Gul
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेतच अश्रू अनावर

पत्रकार सज्जाद गुलविरोधात 3 गुन्हे दाखल

सज्जाद गुलविरोधात 3 नोंदवण्यात आले आहेत. यातील 2 गुन्हे पोलिसांच्या तक्रारीवरून तर एक गुन्हा स्थानिक तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी बांदीपोरातील सुंबल न्यायालयाने सज्जाद गुलला जामीनमंजूर केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने त्याच्यावर पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com