J&K Poonch Terror Attack: पूंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, वाहनाला लागली आग; पाच जवान शहीद

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी गोळीबार केला, नंतर ग्रेनेडने हल्ला केला.
Jammu-Kashmir
Jammu-KashmirTwitter/ @AHindinews
Published on
Updated on

Five Army Soldiers Killed as Vehicle Catches Fire in Poonch: जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी गोळीबार केला, नंतर ग्रेनेडने हल्ला केला. त्यामुळे वाहनाला आग लागली आणि राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले.

तर एक जवान जखमी झाला आहे. त्यांना राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुंछमधील जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील भाटा धुरियन भागात हा हल्ला झाला.

दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले. तपासानंतर लष्करप्रमुखांना हल्ल्याची माहिती देण्यात आली. लष्कराचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांनी ट्रकवर हँडग्रेनेड टाकले असावे ज्यामुळे गाडीला आग लागली.

या भागात ड्रोनद्वारे टेहळणी आणि शोध मोहीम सुरु आहे. पूंछचा हा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. हा परिसर पाकिस्तानला (Pakistan) लागून आहे.

Jammu-Kashmir
Jammu-Kashmir: पाकिस्तानच्या नव्या कुरापती; ड्रोनद्वारे जम्मूमध्ये पाठवले चिनी पिस्तूल, काडतुसे आणि हातबॉम्ब

दुपारी 3.15 च्या सुमारास हा हल्ला झाला

संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 3.15 वाजता जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात ग्रेनेड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या वाहनाला आग लागली.

लष्कराचे वाहन भिंबर गली येथून पूंछ जिल्ह्यातील सांगियोतकडे जात असताना हा अपघात (Accident) झाला. 13 सेक्टर राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर आले आहेत. संपूर्ण परिसरात लष्कर आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली आहे. शहीद झालेल्या जवानांची माहितीही त्यांना देण्यात आली.

मनोज पांडे म्हणाले की, भारतीय लष्कराचे जवान जमिनीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करत आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Jammu-Kashmir
Jammu And Kashmir: लष्कर-ए-तैय्यबाचे दोन दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातून पळाले, राज्यात अलर्ट जारी

गेल्या वर्षी 40 भाविकांचा बळी गेला होता

गेल्या वर्षी, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटराजवळ वैष्णोदेवी मंदिरात यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर 22 जण जखमी झाले होते.

'जम्मू आणि काश्मीर फ्रीडम फायटर्स' या अज्ञात दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या एका 'विशेष पथकाने' घडवून आणलेला 'आयईडी स्फोट' होता, असे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com