Chandrayaan-3 Mission
Chandrayaan-3 MissionDainik Gomantak

Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 मिशनबाबत ISRO ने दिली महत्त्वाची अपडेट, अंतराळात व्यवस्थित...

Chandrayaan-3 Mission: भारताच्या अवकाश शक्तीला संपूर्ण जग सलाम करत आहे. चांद्रयान-3 चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
Published on

Chandrayaan-3 Mission: भारताच्या अवकाश शक्तीला संपूर्ण जग सलाम करत आहे. चांद्रयान-3 चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चीन, अमेरिका, युरोप, रशियासह अनेक अवकाश संस्थांनीही शुभेच्छा पाठवल्या आहेत.

दरम्यान, चांद्रयान-3 मिशनबाबत इस्रोने ट्विट करत मोठी अपडेट दिली आहे. अंतराळयान पूर्णपणे ठीक आहे आणि त्यांच्या सूचनांचे योग्य पालन करत आहे. इस्रोने सांगितले की, यान आता 41762 किमी x 173 किमी कक्षेत आहे. 14 जुलै रोजी दुपारी हे यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले.

चांद्रयानाचा प्रवास

अंतराळयान (लँडरसह प्रोपल्शन मॉड्यूल) चंद्राच्या कक्षेकडे जात असताना पृथ्वीपासून (Earth) 170 किमी जवळील आणि 36,500 किमी दूर असलेल्या लंबवर्तुळाकार वर्तुळात सुमारे पाच-सहा वेळा पृथ्वीभोवती फिरेल.

पुरेसा वेग प्राप्त केल्यानंतर, चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या 100 किमी वर पोहोचेपर्यंत एक महिन्यापेक्षा जास्त प्रवास करेल. या उंचीवर पोहोचल्यानंतर, लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगसाठी उतरण्यास सुरुवात करेल.

Chandrayaan-3 Mission
Chandrayaan-3 Mission: ‘चांद्रयान-३’ आज झेपावणार; श्रीहरीकोटा येथून होणार प्रक्षेपण

चंद्रावर लँडिंग

इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, जर सर्व काही ठीक झाले तर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता त्याचे सॉफ्ट लँडिंग होईल. मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही चंद्राचा दक्षिण ध्रुव प्रदेश संशोधनासाठी निवडण्यात आला आहे, कारण चंद्राचा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवापेक्षा खूप मोठा आहे.

आजूबाजूला कायम सावली असलेल्या भागात पाणी असण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठीही ही जागा निवडण्यात आली आहे. यासोबतच त्याच्या सॉफ्ट लँडिंगसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com