Jahangirpuri Violence: 'सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही...'

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPIM) नेत्या वृंदा खरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन या ठिकाणी पोहोचल्या आणि बुलडोझरला रोखताना दिसल्या.
Jahangirpuri Violence
Jahangirpuri ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

जहांगीरपुरीमधील (Jahangirpuri) अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPIM) नेत्या वृंदा खरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन या ठिकाणी पोहोचल्या आणि बुलडोझरला रोखताना दिसल्या. यावेळी खरात सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशाची प्रत दाखवतानाही दिसल्या. (jahangirpuri violence Communist Party of India leader Vrinda Kharat was seen blocking a bulldozer)

वास्तविक, जमियत उलेमा-ए-हिंदच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीतील (Jahangirpuri) बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. 12 वाजण्याच्या सुमारास सीपीएम नेत्या वृंदा खरात या आदेशाची प्रत घेऊन घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी त्यांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना काम तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. एका व्हिडिओमध्ये त्या बुलडोझरसमोर उभ्या राहीलेल्या दिसून येत आहेत. त्यांनी बुलडोझरचा मार्ग आडवला. सोबतच न्यायालयाच्या आदेशाची प्रतही दाखवली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन तासांनी ही कारवाई थांबवण्यात आली.

Jahangirpuri Violence
Jahangirpuri Violence: हिंसाचारात सहभागी अन्सारसह पाच आरोपींवर NSA लागू

काय आहे संपूर्ण प्रकरण

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये शनिवारी हनुमान जयंती मिरवणुकीत जातीय संघर्ष झाला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. या चकमकीनंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जागेवर आज बुलडोझर चालवण्यात आला. सुरक्षेसाठी 1500 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता अतिक्रमणविरोधी मोहिम सुरु करण्यात आली. जी सुमारे 12 वाजेपर्यंत चालली. यावेळी एमसीडीच्या 14 संघ देखील उपस्थित होते. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. असे असतानाही जहांगीरपुरीमध्ये काही काळ बुलडोझर फिरवून तोडफोड करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com