टीव्ही न्यूज अँकर रोहित रंजनला (News Anchor Rohit Ranjan) सुप्रीम कोर्टाने आज (Supreme Court) दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात रोहित रंजनविरुद्ध कोणतेही जबरदस्ती पाऊल उचलू नये असे निर्देश देखील दिले आहेत. (Supreme Court reassures TV news anchor Rohit Ranjan)
खरं तर, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ सादर केल्याबद्दल रोहित रंजनवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यावर सुप्रीम कोर्टात आज म्हणजेच शुक्रवारी सुनावणी पार पडली.
1 जुलै रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधींनी केरळमधील त्यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीच्या वक्तव्याचा उदयपूरशी संबंध जोडला होता तर यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप देखील घेतला होता.
यानंतर छत्तीसगड पोलिसांनी अँकरवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यासाठी गाझियाबादला पोहोचले होते. पण यूपी आणि छत्तीसगड पोलिसांमध्ये बराच काळ संघर्ष झाला आणि शेवटी रायपूर पोलिसांना परतावे लागले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.