

ISRO Oneweb Satellites: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी इतिहास रचला. इस्रोने रात्री उशिरा श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले सर्वात वजनदार रॉकेट LVM3-M2 प्रक्षेपित केले. इस्रोने या रॉकेटद्वारे 36 ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. सुमारे 43.5 मीटर लांबीचे हे रॉकेट रविवारी रात्री 12.07 वाजता प्रक्षेपित करण्यात आले.
दरम्यान, सुमारे 43.5 मीटर लांब रॉकेटचे हे प्रक्षेपण असल्याचे इस्रोचे अध्यक्ष म्हणाले. 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LVM3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल, असेही ते म्हणाले.
इस्रोचे अध्यक्ष शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांनी पुढे सांगितले की, इस्रोच्या (ISRO) रॉकेट LVM3 ने OneWeb या खाजगी कम्युनिकेशन फर्मचे 36 उपग्रह वाहून नेले.
अशा प्रकारचे पहिले भारतीय रॉकेट
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि यूके-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएट्स लिमिटेड (वनवेब लिमिटेड) यांच्यातील व्यावसायिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून हे अभियान राबवले जात आहे. स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, वनवेबचे 36 उपग्रह या मिशन अंतर्गत वाहून नेण्यात आले आहेत, जे 5,796 किलोपर्यंतचे 'पेलोड' वाहून नेणारे पहिले भारतीय रॉकेट बनले आहे. भारती एंटरप्रायझेस ही OneWeb मधील प्रमुख गुंतवणूकदार आहे.
पुढील वर्षी पुन्हा 36 उपग्रह प्रक्षेपित केले जातील
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ (ISRO Chairman S. Somnath) म्हणाले की, 'इस्रोच्या एलव्हीएम-3 रॉकेटने वनवेब या खाजगी कंपनीचे 36 उपग्रह वाहून नेले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LVM-3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल. 36 पैकी 16 उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले असून उर्वरित 20 उपग्रह वेगळे केले जातील.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.