दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने त्यांच्या 'व्हॉइस ऑफ खोरासान' या मासिकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
या आवृत्तीत IS ने नूह हिंसाचार आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणावर लेख लिहून भारतीय मुस्लिमांना जिहादसाठी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
यासोबतच हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांच्या नावाचा मासिकात उल्लेख करुन धमकीही देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने आपल्या 'व्हॉईस ऑफ खोरासान' या मासिकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
खोरासान नावाच्या प्रोपोगंडा मासिकाच्या या आवृत्तीत, IS ने नूह हिंसा आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणावर लेख लिहून भारतीय मुस्लिमांना जिहादसाठी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच, मासिकात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत.
सोशल मीडिया (Social Media) आणि टेलिग्रामच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या आयएस मासिकावर एनआयए सातत्याने कडक कारवाई करत आहे.
दुसरीकडे, VOICE OF KHURASAN या मासिकाच्या कव्हर पेजवर नूहमधील घरांवर चालवण्यात आलेल्या बुलडोझरचा फोटो वापरण्यात आला आहे.
मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांचा उल्लेख करत मासिकात लिहिले आहे की, 'या लोकांनी भडकाऊ व्हिडिओ बनवला, त्यानंतर मुस्लिमांवर हल्ले सुरु झाले. मुस्लिमांची 500 घरे जाळण्यात आली, ज्याला हरियाणाच्या (Haryana) गृहमंत्र्यांचा पाठिंबा होता.'
मासिकात बदला घेण्याबाबत उल्लेख करण्यात आला असून, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनाही त्यांचे नाव लिहून धमकावण्यात आले आहे.
इस्लामिक स्टेट मासिक व्हॉइस ऑफ खोरासानच्या कव्हर पेजवर बुलडोझरचा फोटो वापरण्यात आला आहे. मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांचा उल्लेख करत मासिकात लिहिले आहे की, या लोकांनी एक भडकाऊ व्हिडिओ बनवला, त्यानंतर मुस्लिमांवर हल्ले सुरु झाले. मुस्लिमांच्या 500 घरांची तोडफोड आली, ज्याला हरियाणाच्या गृहमंत्र्यांचा पाठिंबा होता. मासिकामध्ये सूड उगवण्यासंबंधी सांगण्यात आले आहे.
तसेच, 31 ऑगस्ट 2023 रोजी हरियाणाच्या मेवात (नूह) मध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला होता, त्यानंतर हिंसाचार उसळला होता. विश्व हिंदू परिषद-विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते धार्मिक मिरवणूक काढत असताना हिंसाचार उसळला.
मिरवणूक नूह झंडा पार्क येथे पोहोचताच दगडफेक सुरु झाली आणि अनेक वाहनांना आग लावण्यात आली. वृत्तानुसार, ही दगडफेक आणि गोळीबार मुस्लिम बाजूच्या लोकांनी केला होता, त्यानंतर हिंदू बाजूचे लोकही भडकले.
दरम्यान, दोन्ही समुदायांनी एकमेकांवर दगडफेक केली. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. नूह येथे मिरवणूकीदरम्यान गोंधळ इतका वाढला की, दगडफेकीसह गोळीबारही करण्यात आला.
या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. नूह हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एक नागरिक ठार झाले तर 10 हून अधिक पोलिस जखमी झाले.
त्याचवेळी, हरियाणाच्या नूहमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. 28 ऑगस्ट (सोमवार) रोजी ब्रिजमंडल शोभायात्रा काढण्यावर हिंदू संघटना ठाम आहेत. त्याचवेळी, प्रशासनाने यासाठी परवानगी दिलेली नाही.
एवढेच नाही तर बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
दुसरीकडे, नूहमध्ये प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे.
नूहमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून, त्याअंतर्गत सोमवारपर्यंत एका भागात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नूह येथील नल्हार शिव मंदिराच्या 1.5 किमी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या मंदिरात 31 जुलै रोजी मिरवणुकीदरम्यान हिंसाचार उसळला होता. आज केवळ स्थानिक लोकांना त्यांचे ओळखपत्र दाखवून येथे प्रवेश दिला जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.