Azaan Controversy: भाजप नेते ईश्वरप्पा यांचे वादग्रस्त वक्तव्य, अजानवर केले 'हे' मोठे भाष्य

Azaan Row: कर्नाटकातील मंगळुरु येथे एका सभेला संबोधित करताना भाजपचे दिग्गज नेते केएस ईश्वरप्पा यांनी अजानवर मोठे वक्तव्य केले आहे.
BJP Leader KS Eshwarappa
BJP Leader KS Eshwarappa Dainik Gomantak
Published on
Updated on

Azaan Row: कर्नाटकातील मंगळुरु येथे एका सभेला संबोधित करताना भाजपचे दिग्गज नेते केएस ईश्वरप्पा यांनी अजानवर मोठे वक्तव्य केले आहे.

वास्तविक, जेव्हा केएस ईश्वरप्पा भाषण देत होते, तेव्हाच मशिदीत अजान सुरु झाले. यानंतर केएस ईश्वरप्पा यांनी भाषणाच्या मध्यातच अजानवर भाष्य करण्यास सुरुवात केली. के.एस.ईश्‍वरप्पा यांनी अजानचे वर्णन डोकेदुखी म्हणून केले.

के.एस.ईश्‍वरप्पा म्हणाले की, 'मी जिथे जातो, तिथे माझ्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरते. हा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल आहे, आज ना उद्या ते निश्चितच बंद होईल, कोणीही शंका घेण्याची गरज नाही. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शिकवले आहे.'

BJP Leader KS Eshwarappa
अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक

ईश्वरप्पा यांनी उपाय सांगितला

माईकवर ओरडून अल्लाहला ऐकू येत असेल तर अल्लाह बहिरे आहे का हे मला विचारावे लागेल. या सगळ्याची गरज नाही, मी याआधीही सांगितले होते की, यासंबंधी लवकरच समाधान निघेल.

BJP Leader KS Eshwarappa
मोदी सरकार हे मूर्ख लोकांनी भरलेलं,भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची स्वकीयांवरच जहरी टीका

अजानवरुन वाद

विशेष म्हणजे, लाऊडस्पीकरवरुन दिले जाणारे अजान हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. सोनू निगमपासून ते राज ठाकरेंपर्यंत प्रसिद्ध गायकांनी यावर वक्तव्ये केली आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) धार्मिक स्थळांवरुन लाऊडस्पीकर हटवण्यात आले. याशिवाय, राज ठाकरेंनी महाराष्ट्रात लाऊडस्पीकरविरोधातही मोहीमही राबवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com