दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा मोठा खुलासा, राम मंदिर अन् बडे नेते होते निशाण्यावर!

Delhi Police: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी 3 ISIS दहशतवाद्यांना अटक केली. या तिन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत मोठे खुलासे केले आहेत.
Terrorist
TerroristDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Police: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी 3 ISIS दहशतवाद्यांना अटक केली. या तिन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत मोठे खुलासे केले आहेत. चौकशीत दहशतवाद्यांनी सांगितले की, काही मंदिरांसह देशातील अनेक बडे नेते त्यांचे लक्ष्य होते.

या काळात अयोध्येतील राम मंदिरासह मुंबईतील छाबरा हाऊसही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. चौकशीदरम्यान शाहनवाज, रिजवान आणि अर्शद या तीन दहशतवाद्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

ही प्रसिद्ध ठिकाणे निशाण्यावर

ISIS च्या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांच्या (Terrorists) तोंडून अनेक मोठी गुपिते वधवून घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दहशतवादी शाहनवाज उर्फ ​​सैफी, अर्शद आणि रिझवान यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

देशातील अनेक प्रसिद्ध ठिकाणे त्यांचे लक्ष्य असल्याचे दहशतवाद्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे टार्गेट अयोध्येचे राम मंदिर, मुंबईचे छाबरा हाऊस आणि देशातील अनेक बडे नेते होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवाद्यांना त्यांची योजना पूर्ण होण्याआधीच अटक केली आहे.

Terrorist
Jammu And Kashmir: अनंतनागमध्ये कर्नल-मेजर अन् DSP शहीद, काल रात्रीपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु

या वस्तू जप्त करण्यात आल्या

दिल्लीतून (Delhi) अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांवरुन पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत. शस्त्रांसोबतच शस्त्रे बनवण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणी आयईडी बनवण्याचे साहित्य पोलिसांना सापडले असून त्यासोबत एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे 26/11 पेक्षा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते.

Terrorist
Jammu And Kashmir: बारामुल्लामध्ये मोठा कट फसला, लष्कर-ए-तैय्यबाचे 3 दहशतवादी गजाआड

तिन्ही दहशतवादी सुशिक्षित आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पकडलेले तिघेही अतिरेकी सुशिक्षित आहेत. झारखंडच्या हजारीबाग येथील रहिवासी असलेल्या शाहनवाजने माइनिंग इंजीनिअरिंग केली आहे.

माइनिंग इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या शाहनवाजला ब्लास्ट मटेरियल कसे बनवायचे हे माहित होते. यावेळी दहशतवाद्यांनी पुण्यातील जंगलांचा वापर स्फोटाच्या सरावासाठी केल्याचेही सांगितले.

शाहनवाजसोबतच अटक करण्यात आलेले दोन साथीदार रिझवान आणि अर्शद हे सुशिक्षित आहेत. रिझवानने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे तर अर्शदने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com