'...जम्मू-काश्मीरमधील कारवायांमध्ये', यासीन मलिकची कबुली

तिहार तुरुंगात बंद असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे.
Yasin Malik
Yasin MalikDainik Gomantak
Published on
Updated on

तिहार तुरुंगात बंद असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये आपला हात असल्याची कबुली त्याने न्यायालयासमोर दिली आहे. अलीकडेच, न्यायालयाने यासिन मलिकसह अनेक फुटीरतावादी नेत्यांवर UAPA अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, मलिकने न्यायालयाला (Court) सांगितले की, ''मी UAPA च्या कलम 16 (दहशतवादी क्रियाकलाप), कलम 17 (दहशतवादी क्रियाकलापांसाठी निधी गोळा करणे), कलम 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), कलम 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी (गुन्हेगारी कट) आणि 124-ए (देशद्रोह) अंतर्गत आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही.''

Yasin Malik
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरले

तसेच, 19 मे रोजी विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांसाठी शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकतील. दरम्यान, न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Yasin Malik
जम्मू-काश्मीर विकासाची नवी गाथा लिहिणार; पंतप्रधान मोदींचे व्हीजन

याशिवाय, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यांना या प्रकरणात फरार घोषित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com