IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

IPL Start & Final Date: इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावापूर्वी आता एक मोठा खुलासा झाला आहे.
IPL 2026
IPL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावापूर्वी आता एक मोठा खुलासा झाला आहे. मिनी-लिलावापूर्वी, बीसीसीआयने संघांना आयपीएल कधी सुरू होईल आणि अंतिम सामना कधी याबाबत माहिती समोर आलीय. आयपीएल २०२६ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे, तर अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी होणार आहे. ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ चालणार आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा थोडे जास्त सामने असतील.

आयपीएल २०२६ कधी सुरू होईल?

आयपीएलचा पुढील हंगाम मोठा आणि चांगला होणार आहे. असे वृत्त आहे की प्रत्येक संघ १४ नाही तर १६ सामने खेळेल. यामुळे एकूण सामन्यांची संख्या ७४ वरून ८४ होईल. आयपीएलच्या सुरुवातीबद्दल, क्रिकबझच्या अहवालानुसार, लिलाव २६ मार्च २०२६ रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा ६६ दिवस चालण्याची अपेक्षा आहे.

IPL 2026
Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

अंतिम सामन्याची तारीख

आयपीएल २०२६ ची सुरुवात २६ मार्चला होऊ शकते. २०२६ ची इंडियन प्रीमियर लीग दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालेल. यामुळे क्रिकेटची मजा नक्कीच द्विगुणीत होईल. अहवालानुसार आयपीएलचा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी खेळला जाईल.

IPL 2026
Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

प्रत्येक संघासाठी आयपीएल २०२६ कसे जाईल हे लिलावावर अवलंबून असेल. काही फ्रँचायझींना त्यांचे संघ मजबूत करावे लागतील, तर काहींना बॅकअपची आवश्यकता असेल. मिनी लिलाव आज, १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता सुरू होईल. सर्व संघांसाठी उर्वरित रक्कम खाली दिली आहे:

चेन्नई सुपर किंग्ज - ₹४३.४० कोटी

मुंबई इंडियन्स - ₹२.७५ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ₹१६.४० कोटी

कोलकाता नाईट रायडर्स - ₹६४.३० कोटी

सनरायझर्स हैदराबाद - ₹२५.५० कोटी

गुजरात टायटन्स - ₹१२.९० कोटी

राजस्थान रॉयल्स - ₹१६.०५ कोटी

दिल्ली कॅपिटल्स - ₹२१.८० कोटी

लखनऊ सुपर जायंट्स - ₹२२.९५ कोटी

पंजाब किंग्ज - ₹११.५० कोटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com