India-Pakistan War: "पाकिस्तानने कोणतेही पाऊल उचलले तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल" परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

Dr. S. Jayshankar on India-Pakistan War: पाकिस्तानच्या चुकीला आता माफी नाही; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा जगासमोर स्पष्ट इशारा
Operation Sindoor Upadte
Operation Sindoor UpadteDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या स्थिति पूर्णपणे बिघडली असून पाकिस्तानचा हल्ला परतवून लावत भारताने दमदार कामगिरी बजावली आहे. गुरुवार (दि.8) रोजी संध्याकाळपासून पाकिस्तानी हवाई दल आणि सैन्याने भारतात विविध ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतीय सेनेकडून वेळोवेळी याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेय. भारताने केवळ सैन्य बळानेच नाही तर राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानला कठोर व स्पष्ट दम भरला आहे.

गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मूपासून जैसलमेरपर्यंत विविध ठिकाणी हवाई हल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या या कुरपतीमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाकिस्तानकडून होणाऱ्या या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिलेय आणि दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधत भारताची भूमिका ठामपणे मांडली.

''आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई केली आहे, पण यानंतर पाकिस्तानने कोणतेही पाऊल उचलले तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल', असे भारताने विविध देशांना दिलेल्या संदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Operation Sindoor Indian Air Force Strike Sargodha Airbase
India Rejects Pakistan China Joint Boundary Commission
Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Ishaq Dar Claim Iran Supported Pakistan Operation Sindoor
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com