Navy Recruitment 2021: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात भरती

भारतीय नौदलात (Navy Recruitment) सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता आपण लवकरच आपले स्वप्न साकार करू शकणार आहे.
Navy Recruitment 2021
Navy Recruitment 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय नौदलात सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता आपण लवकरच आपले स्वप्न साकार करू शकणार आहे. जर आपण दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खास आणि महत्वाची माहिती आहे. भारतीय नौदलाने नाविक प्रवेशा अंतर्गत एमआर (मॅट्रिक रिक्रूट) पदांवर पुरुष उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आणि भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली आहे. (Indian Navy job opportunity for 10th pass youth)

त्यानुसार19 जुलै पासून भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 असणार आहे. अशा परिस्थितीत, आपण देखील दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाले असाल तर इंडियन नेव्हीमध्ये करियर बनवू शकता.

या भरतीविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यासह या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही विनामूल्य कोर्समध्ये सामील होऊ शकतात.

Navy Recruitment 2021
Indian Army NCC Recruitment 2021: 56 हजारापर्यंत असणार पगार, असा करा अर्ज

वयोमर्यादा

केवळ तेच उमेदवार भारतीय नौदलाच्या एमआर पदांसाठी अर्ज करू शकतात, ज्यांची वयोमर्यादा 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

ज्या तरुणांना या भरतीसाठी अर्ज करावयाचे आहे त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी .

शारीरिक चाचणी

उंची - 177 सें.मी.

फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) - 1. मिनिटांत 1.6 किमी धावणे, 20 स्केट्स म्हणजेच सिट-अप आणि 10 पुश-अप करावे लागतील.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 19 जुलै 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 23 जुलै 2021

Navy Recruitment 2021
BSF Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुरक्षा दलात संधी

पोस्टचा तपशील

अधिकृत अधिसूचनेनुसार भारतीय नौदलाने ऑक्टोबर 2021 बॅचच्या मेट्रिक रिक्रूटसाठी 350 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार शेफ, मॅनेजर आणि हेल्थ सायंटिस्ट या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

विनामूल्य करा घरीच परीक्षेची तयारी

जर तुम्हाला घरी बसून परिक्षेची तयारी करायची असेल जसे NAVY-MR/NMR, UP-ASI, PET. CTET, UPTET, पॉलिटेक्निक, NDA/NA, CDS, AFCAT, Airforce यासारख्या कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असल्यास आपणही हा कोर्स विनामुल्य अटेंड करू शकता. त्यासाठी तुम्हाला हि परिक्षा पास होणे गरजेचे असणार आहे.

भारतीय नौदल नाविक भरती प्रक्रिया

संगणक आधारित परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com